ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : ५५ गुंठ्यांत मिळविले लाखोंचे उत्पन्न

अल्पभूधारक शेतकऱ्यांपुढे आदर्श, ठिबक सिंचनाद्वारे माळरानावर हिरवाई

सचिन गुरव

सिद्धटेक : डाळिंब, कपाशी, आंबा, कांदा, उडीद, अशाप्रकारची बहुविध पीकपद्धती वापरून केवळ ५५ गुंठ्यांत दर वर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवून येथील तरुण शेतकऱ्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्याचबरोबर, शेतीमध्ये स्वतः कष्ट करण्याची तयारी व जिद्द ठेवल्यास त्या प्रमाणात उत्पन्न मिळते, याचा वस्तुपाठही तरुणांसमोर ठेवला आहे.

प्रशांत वामन सांगळे असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. सिद्धटेकमध्ये विहिरीतील पाण्यावर ठिबक सिंचन प्रणाली वापरून माळरानावर हिरवाई फुलवण्यात या शेतकऱ्याने यश मिळविले आहे. या यशाबाबत ‘सकाळ’शी बोलताना प्रशांत म्हणाला, की शेतात सध्या डाळिंबाची ४५० झाडे आहेत. केशर आंब्याची ३६ झाडे असून, यंदा कपाशीचीही लागवड केली आहे.

याशिवाय उर्वरित क्षेत्रावर कांदा, उडीद अशी पिकेही घेतली जातात. या सर्व पिकांच्या व्यवस्थापनाविषयी माहिती देताना प्रशांत म्हणाला, की भगव्या जातीच्या डाळिंबाच्या झाडांना शिफारशीनुसार स्लरी, जीवामृत, तसेच शेणखत दिले जाते. त्यामुळे डाळिंबांची चमक व रंग सुधारण्यास चांगलीच मदत झाली. ५०० ते ६०० ग्रॅमपर्यंत फळांचे वजन वाढल्याने दरही चांगला मिळाला. यामध्ये बहरांचे नियोजनही फायद्याचे ठरल्याचे प्रशांतने आवर्जून सांगितले.

औजारांपासून अधिकचे उत्पन्न

सध्या सर्वत्र मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणावर सर्वांचाच भर असल्याने, त्यांची गरज ओळखून पेरणी, कोळपणी, रोटर, मळणी यंत्र, कांद्यासाठी सरी यंत्र, गादीवाफा यंत्र अशी यंत्रे भाडेतत्त्वावर देऊन शेतकऱ्यांची ऐन वेळची गरज पूर्ण केली. त्यामुळे या औजारांपासून अधिकचे उत्पन्न मिळविण्यास मदत झाल्याचे प्रशांतने सांगितले.

इतरांकडून अनुकरण

काटेकोरपणे नियोजनाला शेतीमध्ये महत्त्व असते आणि हेच माझ्या यशाचे गमक आहे, हे सांगतानाच, इतरांनीही आपले अनुकरण केले व मीही इतरांना करता येईल तेवढे चांगले मार्गदर्शन करत असतो, असे प्रशांतने सांगितले.

पत्नीची साथ

खते, कीडनाशकांच्या फवारणीसाठी विविध औषधांच्या मात्रा तयार करणे, त्यांची फवारणी करणे, ट्रॅक्टरच्या साह्याने शेतातील विविध प्रकारची कामे पत्नी ज्योत्स्ना करत असल्याची माहितीही प्रशांतने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT