डॉ. काकोडकर sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : कृषी तंत्रज्ञानाच्या अवलंबामुळे ग्रामीण भागाचे सशक्तीकरण शक्य : डॉ. काकोडकर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३६ वा पदवीप्रदान समारंभ उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

राहुरी विद्यापीठ : कृषी पदवीधरांच्या माध्यमातूनच ग्रामीण भारताचा विकास होवू शकतो. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, त्याचा प्रसार, नवीन तंत्रज्ञान मिळण्यासाठी आवश्यक वातावरण कृषी पदवीधरच निर्माण करु शकतात. असे प्रतिपादन राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभामध्ये दीक्षांत भाषणात डॉ. काकोडकर बोलत होते. महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी ऑनलाइन अध्यक्षस्थानी होते. प्रतिकुलपती व कृषिमंत्री अब्दुल सत्तार, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, कुलसचिव प्रमोद लहाळे उपस्थित होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, शेतकऱ्यांना फर्टिलायझरचा अतिवापर न करता सेंद्रीय पीकपद्धती अवलंबून शेती करावी. माती परीक्षण करून शेती करावी. मत्स्यव्यवसायाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविता येवू शकते. कृषी विद्यापीठ चांगले कार्य करत असल्याबद्दल त्यांनी सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.

कृषिमंत्री सत्तार म्हणाले, "शेतकऱ्यांच्या जीवनमानात कशी सुधारणा करता येईल. ही मोठी जबाबदारी नव्या पदवीधरांवर आहे." कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाचा संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याचा अहवाल सादर केला. संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, माजी कुलगुरू, माजी शास्त्रज्ञ यावेळी उपस्थित होते

ब्लॉक : यावेळी डॉ. चारुदत्त मायी व पोपटराव पवार यांना मानाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात आली. सोबत ६२ पीएचडी, ३८२ पदव्युत्तर पदवी व ६३८८ कृषी पदवी असे एकूण ६८३४ पदवी प्रदान करण्यात आल्या. कु. अपूर्वा वामन या विद्यार्थिनीने बी.एस्सी.कृषी पदवीपरिक्षेत प्रथम क्रमांक मिळवून पाच सुवर्णपदके पटकाविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मेस्सी आला अन् ५ मिनिटात गेला... चाहते हजारो रुपये खर्चूनही पाहू शकले नाहीत; ममता बॅनर्जींनी माफी मागत दिले चौकशीचे आदेश

Solapur ZP School: सोलापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये ९५७ शाळांची पटसंख्या वाढली, ५,३९७ नवीन विद्यार्थी

Mumbai Crime: टोपीवरून वाद पेटला; व्यक्तीनं गरोदर महिलेच्या पोटात लाथ मारली, होत्याचं नव्हतं झालं अन्... परिसरात हळहळ

Pakistan: कोणालाच विश्वास बसणार नाही! फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात असं घडलं… इतिहास बदलणारा निर्णय?

Latest Marathi News Live Update: आश्वासन फसवे ठरल्याचा आरोप करत युवा प्रशिक्षणार्थी सरकारविरोधात रस्त्यावर

SCROLL FOR NEXT