ahmednagar sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : पोलिस ठाण्यात डास बनले ‘अंमलदार’

नेवाशातील स्थिती : तहसील कार्यालयाचीही दुरवस्था, आरोग्य धोक्यात

सुनील गर्जे

नेवासे : सर्वत्र डेंगी, मलेरियाची साथ जोरात असताना नेवासे तहसील कार्यालय व पोलिस ठाण्याच्या आवारातील भंगार साहित्यामुळे पोलिस व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाच्या पाण्यामुळे साचलेले डबके, डासांचा उपद्रव व दुर्गंधीमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

हे चित्र केवळ नेवासे पोलिस ठाण्याचेच नसून, तालुक्यातील तीन पोलिस ठाणी व चार पोलिस दूरक्षेत्रांतही आहे. डासांनी पोलिस ठाणे, तहसील कार्यालयात आश्रय घेतल्याने अधिकारी, कर्मचारी व तेथे ये-जा असलेले फिर्यादी, साक्षीदार, पंच, जामीनदार यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

नेवासे पोलिस ठाण्यासह तालुक्यातील सोनई, शनिशिंगणापूर या पोलिस ठाण्यांबरोबरच कुकाणे, प्रवरासंगम या पोलिस दूरक्षेत्रांना भेट दिल्यास, आवारात मोठ्या प्रमाणात जप्तीतील वाहने दृष्टीस पडतात. वर्षानुवर्षे तेथील दुचाकी वाहने, दारूचे डबे, चारचाकी वाहने व त्यात साचलेले पावसाचे पाणी साथरोगांचे उत्पत्ती स्थळ बनत आहे. या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात डास, अळ्यांचे वास्तव्य असल्याचे पाहायला मिळत आहे. भंगार साहित्याची अशीच स्थिती राज्य उत्पादनशुल्कसह इतर शासकीय कार्यालयांमध्ये पाहायला मिळत आहे. हिवताप निर्मूलन विभागाने आपल्या मोहिमेचा प्रारंभ शासकीय कार्यालयांपासूनच करावा, अशी स्थिती आहे.

नेवासे पोलिस ठाणे व हद्दीतील सर्व पोलिस दूरक्षेत्रांच्या आवारातील जप्त वाहनांच्या (भंगार) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, या वाहनांचा लवकरात लवकर लिलाव होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

- बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक, नेवासे

पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डेंगीच्या डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत असते. नगरपंचायतीकडून खबरदारी म्हणून नुकतेच पोलिस ठाणे व तहसील कार्यालय परिसरात फॉगिंग करण्यात आले आहे.

- अंबादास गर्कळ, मुख्यधिकारी, नगरपंचायत, नेवासे

नगरपंचायतीचा आधार

ग्रामीण भागात आरोग्यसंवर्धनासाठी विविध उपाययोजना व उपक्रम राबविले जातात. कीटकजन्य आजारांच्या नियंत्रणासाठी हिवताप विभागाकडून स्वतंत्र मोहीम राबविली जाते. शहरात मात्र असा कोणताच उपक्रम राबविला जात नाही. मात्र, नेवासे शहरासह तहसील, पोलिस ठाणे परिसरात नगरपंचायतीकडून फॉगिंगचा वापर केला जात असल्याने, जीवघेण्या डेंगीपासून काही प्रमाणात नक्कीच सुटका होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rate : सोन्याच्या दरातील घसरणीमुळे खरेदीला प्रतिसाद, अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीचे दर स्थिर; आंतरराष्ट्रीय बाजार बंद

महिला आरक्षणासाठी आक्रमक पण महिलांना उमेदवारीत भाजप मागे; आकडे आले समोर

RTOचा अजब कारभार! साताऱ्यातील बुलेटचा नंबर कर्नाटकातल्या कारला, ५ वर्षांपासून पाठपुरावा तरी कारवाई नाहीच

मुली लवकर मूव्ह ऑन होतात पण... तो धक्का आणि ५२ व्या वर्षीही अविवाहित राहिला 'धुरंधर'चा आलम भाई; कारण सांगत म्हणाला-

Latest Marathi News Live Update: समृद्धी महामार्गालगत नवनगरे उभारण्याचा सरकारचा प्रकल्प ठप्प पडला

SCROLL FOR NEXT