ahmednagar-municipal-corporation sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : महापालिकेत आज १४०० कोटींवर चर्चा

महापालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील फुगवण्यात आलेले आहे

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : महापौर रोहिणी शेंडगे यांनी बोलाविलेल्या विशेष महासभेत उद्यापासून (बुधवार) अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी स्थायी समितीला सादर केलेल्या एक हजार २४० रुपयांच्या अंदाजपत्रकात १४७ कोटी रुपयांची वाढ करत स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी सुमारे चौदाशे कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापौर शेंडगे यांना सादर केले. त्यावर महासभेत चर्चा रंगणार आहे.

महापालिकेचे अंदाजपत्रक दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील फुगवण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात वसूल होणारा मालमत्ता कर आणि अंदाजपत्रकात वसूल होणारा कर, यात मोठी तफावत आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांवर स्वहिस्सा म्हणून महापालिकेला मोठ खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आलेली आहे.

अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्वच मुद्द्यांवर आणि शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांवर सभेत सविस्तर चर्चा होणार आहे. ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक सभेत काय भूमिका घेतात, याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. मुळात आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सादर केलेले अंदाजपत्रक त्यात स्थायी समितीने सुचविलेली सुमारे दीडशे कोटी रुपयांची वाढ, त्यात पदाधिकाऱ्यांचा शहर विकास निधी, शहरातील रस्त्यांचा प्रश्न, महापालिकेचे अपेक्षित आणि प्रत्यक्षात वसूल होणारे उत्पन्न, यावर महासभेत चर्चा रंगणार आहे.

अखेर वृक्ष लागवडीला मुहूर्त

शहरातील १७ प्रभागांत तब्बल पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. प्रत्येक वृक्ष १२ फूट उंचीचा असणार आहे. त्यासाठी महापालिकेने एक कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. या वृक्ष लागवडीची निविदा स्थायी समितीच्या सभेत मंजुरीस ठेवण्यात आली होती. सभापती गणेश कवडे यांनी या निविदेला मंजुरी देत अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शहरातील पर्यावरणाचा विषय मार्गी लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कोयना धरणातून सांडव्यावरील विसर्ग बंद; पायथा विद्युतगृहातून १,०५० क्युसेक पाणी सुरू

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरातील 'डीप डिप्रेशन'ची तीव्रता वाढली; महाराष्ट्रात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा, ओडिशा-आंध्र प्रदेश किनारपट्टीवर काय स्थिती?

IND vs AUS, U19 ODI: कर्णधाराचं शतक, सेहवागची फटकेबाजी; द्रविडला विश्रांती अन् युवा भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

Akola Crime : हिवताप अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या ताब्यात; आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात लाचप्रकरणी कारवाई

Phulambri News : मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलवर मोर्चा..! अमोल खुणे व अजय बारस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT