Ahmednagar Municipal Corporation gets Rs 26 crore from district planning 
अहिल्यानगर

नगर महापालिकेला जिल्हा नियोजनकडून हवेत २६ कोटी रूपये

अहमदनगर

नगर ः महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली आहेत. याच दरम्यान महापालिकेचे आयुक्त सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे आला आहे. त्यामुळे महापालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून निधीची अपेक्षा असून, 26 कोटींचा निधी मिळावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. 

महापालिकेतील अनेक विकासकामे सध्या निधीअभावी थांबली आहेत. सावेडी उपनगरातील नाट्यगृहाचे काम निधी नसल्याने बंद पडले आहे. ते पुन्हा सुरू व्हावे, यासाठी निधीची गरज आहे. त्याकरिता महापालिकेने पाच कोटींचा प्रस्ताव जिल्हा नियोजनला सादर केला आहे. 

नगरोत्थान योजनेतून (जिल्हास्तर) दहा कोटींची मागणी केली आहे. त्यातून शहरातील रस्ते व अन्य नागरी प्रश्‍न सोडविण्याचा प्रस्तावही सादर करण्यात आला आहे.

या बरोबरच दलित वस्ती विकासासाठी 10 कोटी, तर दलितेतर वस्ती विकासासाठी सहा कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या चारही प्रस्तावांसंदर्भात जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्‍त डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

तिला महापालिका उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी अनिल बोरगे आदी उपस्थित होते. 

बैठकीत डॉ. भोसले यांनी, महापालिकेकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. बैठकीनंतर पालक सचिवांसमवेत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या चारही प्रस्तावांची माहिती दिली. त्यामुळे आता जिल्हा नियोजन समितीतून महापालिकेला यापैकी किती निधी मिळतो व त्यावर महापालिका कोणत्या विकासकामांना वेग देणार, हे ठरणार आहे. 

महापालिकेचे प्रस्ताव 
नाट्यगृह - पाच कोटी 
नगरोत्थान - पाच कोटी 
दलित वस्ती - दहा कोटी 
दलितेतर वस्ती - सहा कोटी 

अहमदनगर


जिल्हा नियोजन समितीकडे महापालिकेने 26 कोटींच्या निधीसाठी चार प्रस्ताव सादर केले आहेत. 
- डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त, सामान्य प्रशासन, महापालिका , अहदमनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उड्डाणपुलाच्या कामावेळी मातीचा ढिगारा कोसळला, दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर

Shirwal Accident News: बर्थडेनंतर केलेला महाबळेश्वरचा प्लॅन, मध्यरात्री अपघातात ४ मित्रांचा मृत्यू; चौघेही बसलेले मागच्या सीटवर

Athani Crime News: पतीचा खून करून अपघाताचा केला बनाव, प्रियकराच्या मदतीने कृत्य

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’ची आज प्रारूप मतदार यादी, २१ पर्यंत हरकती

Mumbai Monsoon: मुंबईत आज मुसळधारेचा इशारा;वाहतूक सुरळीत; समुद्रात ४.६८ मीटर उंचीच्या मोठ्या लाटा

SCROLL FOR NEXT