Ahmednagar Municipal Corporation had in November decided to waive 75 per cent penalty on property tax arrears..jpg 
अहिल्यानगर

शास्तीमाफी मुदतवाढीवर महापालिकेचा निर्णय नाही ; कर विभागाची आज पुन्हा होणार बैठक

अमित अवारी

अहमदनगर : महापालिकेने नोव्हेंबरमध्ये मालमत्ताकराच्या थकबाकीवर 75 टक्‍के शास्तीमाफीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज या शास्तीमाफीची मुदत संपली. शास्तीमाफीच्या निर्णयाने महिनाभरात महापालिकेने 25 कोटीहून अधिक मालमत्ताकर वसूल केला. त्यामुळे शास्तीमाफीला आणखी मुदतवाढ देण्याची मागणी होत होती. त्यावर निर्णय घेण्यासाठी आज महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी कर विभागाची बैठक घेतली. मात्र, ठोस निर्णय होऊ शकला नाही. आता याबाबत आज दुसरी व अंतिम बैठक होणार आहे. मुदतवाढीच्या निर्णयाकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन केल्याने महापालिकेचा यंदा केवळ 13 कोटींचा मालमत्ताकर वसूल झाला होता. महापालिकेने 715 कोटी 71 लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने विरोधी पक्षनेते संपत बारस्कर व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी शास्तीमाफीची मागणी केली होती. त्यासाठी महापालिकेत आंदोलनही केले. त्यानुसार, नोव्हेंबरमध्ये नगरकरांसाठी 75 टक्‍के शास्तीमाफी देण्यात आली.

नागरिकांना मालमत्ताकर भरता यावा, यासाठी महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयांना कोणतीही सुटी दिली नाही. शास्तीमाफीचा लाभ घेत, नागरिकांनी थकीत मालमत्ताकर भरण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयांत रांगा लावल्या. शास्तीमाफीसाठीची मुदत आज संपली. महिनाभरात महापालिकेची 25 कोटींची वसुली झाली. त्यामुळे यंदाच्या वर्षात मालमत्ताकर वसुली 38 कोटींच्या घरात पोचली. 
 
 हे ही वाचा : मुलासाठी सासरी छळ, विवाहितेला काढले उपाशीपोटी घराबाहेर

दरम्यान, महापालिकेने 2018 मध्ये अशीच शास्तीमाफी दोन महिन्यांसाठी दिली होती. त्याच धर्तीवर यंदाही दोन महिन्यांसाठी शास्तीमाफी देण्याची मागणी विविध सामाजिक संघटना व शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी महापालिका आयुक्‍तांकडे केली. त्यानुसार आज आयुक्‍तांनी कर विभागाची बैठक घेऊन वसुलीचा आढावा घेतला. शास्तीमाफीला मुदतवाढ देण्याबाबत चर्चाही झाली; मात्र बैठकीत एकमत न झाल्याने, आज पुन्हा याच विषयावर बैठक होणार आहे. शास्तीमाफीला मुदतवाढ मिळते का, तसेच मिळाली तर ती किती टक्‍के असेल याची उत्तरे उद्याच बैठकीमध्ये समजू शकतील.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT