Ahmednagar municipal corporation has received two tenders 
अहिल्यानगर

नगरच्या पथदिव्यांसाठी दोन निविदा

अमित आवारी

अहमदनगर : शहरातील स्मार्ट एलईडी प्रकल्प राबविण्यासाठी दोन वेळा राबविलेल्या निविदाप्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने तिसऱ्यांदा ई-निविदा प्रक्रिया राबविली. त्यातील निविदा सोमवारी उघडण्यात आल्या असून, त्यात महापालिकेला दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 
 
महापालिकेने पहिल्यांदा राबविलेल्या ई-निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्यांदा ई-निविदा प्रक्रियेत एक निविदा प्राप्त झाली होती. मात्र, तांत्रिक त्रुटीमुळे ती फेटाळण्यात आली. त्यामुळे तिसऱ्यांदा ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. शहरातील 30 हजार खांबांवर सुमारे 35 हजार 105 दिवे आहेत. त्यातील 10 टक्‍के म्हणजे सुमारे तीन हजार दिवे बंद आहेत. एलईडी पथदिवे बसविल्यास वीज कमी लागणार आहे. शहरातील पथदिव्यांच्या वीजबिलापोटी महापालिकेला सध्या दरमहा सुमारे 38 लाखांचा खर्च येतो. वर्षभरात केवळ 4 कोटी 56 लाख रुपये वीजबिलांवर खर्च होतात. असे असूनही नगर शहर सध्या अंधारात आहे. 

सोमवारी तिसऱ्या ई-निविदा प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात आल्या. त्यात दोन निविदा प्राप्त झाल्या आहेत. या निविदाप्रक्रियेतील निविदा मंजूर झाल्यास शहरात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT