Ahmednagar Municipal Corporations budget of Rs 685 crore has been presented before the Standing Committee 
अहिल्यानगर

महापालिकेचे 685 कोटीचे अंदाजपत्रक 'स्थायी' समोर सादर

अमित आवारी

अहमदनगर : महापालिकेचे 2021-22 वर्षाचे आर्थिक अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सुमारे दहा दिवस अभ्यास केला. गेली दोन ते तीन वर्षांतील आकडेवारीनुसार अंदाजपत्रक तयार केले आहे. महापालिकेत जमा व खर्चात मोठी तफावत आहे. त्यामुळे भांडवली खर्च हे शासकीय निधीतून भागवावे लागत आहे. शासकीय निधीवर अवलंबून रहावे लागू नये, म्हणून महापालिकेला उत्पन्न वाढविणे गरजेचे आहे, असे महापालिका आयुक्‍त शंकर गोरे यांनी सांगितले.
 
महापालिकेच्या स्थायी समितीसमोर महापालिकेचे 2021-22 चे अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक मुदस्सर शेख, प्रकाश भागानगरे, सुप्रिया जाधव, समद खान, रवींद्र बारस्कर, उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्‍त यशवंत डांगे, मुख्यलेखाधिकारी प्रवीण मानकर, नगरसचिव शाहजहान तडवी, लेखा विभागाचे अनिल लोंढे आदी उपस्थित होते. 

महापालिकेचे 685 कोटी 89 लाख रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्‍तांनी सादर करताच प्रकाश भागानगरे यांनी अभ्यासासाठी एक दिवसाचा कालावधी द्यावा, अशी सूचना मांडली. या सूचनेला मुदस्सर शेख यांनी अनुमोदन दिले. त्यानुसार उद्या (शुक्रवारी) अंदाजपत्रकावर चर्चा होणार आहे. 
 
कोरोनामुळे विशेष दक्षता
 
शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता स्थायी समितीतील सदस्यांची आरोग्य तपासणी व हातावर सॅनिटायझर फवारून नंतरच सभागृहात प्रवेश देण्यात आला. या उपक्रमाचे सभापती घुले यांनी कौतूक केले. 

रस्त्यांपेक्षा पथदिव्यांनाच निधी जास्त
 
शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. महापालिकेने नवीन रस्ते करण्यासाठी एक कोटी 75 लाख तर रस्ते पॅचिंगसाठीही एका कोटी 75 लाख रुपये दिले आहेत. तर पथदिवे बसविण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाही पथदिव्यांसाठी 6 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने रस्ते दुरूस्तीपेक्षा रात्री रस्त्यांतील खड्डे दिसण्यावर खर्च करण्याचा घाट घातला आहे. मोकाट कुत्री, जनावरे पकडण्यात येत नसतानाही 1 कोटी 10 लाख तसेच कोंडवाड्याला 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

अंदाजपत्रकाची वैशिष्ट्ये 

उत्पन्न 
- महसुली उत्पन्न - 305 कोटी 95 लाख 
- महसुली खर्च (संकलीत कर, जीएसटी अनुदान आदी) - 255 कोटी 24 लाख 
- भांडवली जमा - 332 कोटी 63 लाख 
- भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व महापालिका हिस्सा धरून जमा - 385 कोटी 71 लाख 

खर्च 

वेतन, भत्ते व मानधनावरील खर्च - 122 कोटी 
पेन्शन - 38 कोटी 
पाणी पुरवठा वीज बिल - 31 कोटी 50 लाख 
स्ट्रीट लाईट वीज बिल - 6 कोटी 50 लाख 
शिक्षण मंडळ वर्गणी - 4 कोटी 
महिला व बाल कल्याण योजना - 51 लाख 
अपंग पुनर्वसन योजना - 51 लाख 
मागासवर्गीय कल्याणकारी योजना - 1 कोटी 52 लाख 
सदस्य मानधन - 1 कोटी 80 लाख 
औषधे व उपकरणे - 60 लाख 
सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी - 6 कोटी 11 लाख 
कचरा संकलन व वाहतूक - 5 कोटी 
पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरूस्ती - 70 लाख 
टॅंकरद्वारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी - 1 कोटी 82 लाख 
अशुद्ध पाणी आकार - 2 कोटी 
वाहने खरेदी - एक कोटी 85 लाख 
नवीन रस्ते - एक कोटी 75 लाख 
रस्ते दुरूस्ती - एक कोटी 75 लाख 
इमारत दुरूस्ती - 40 लाख 
ओढे नाले साफसफाई - 41 लाख 
आपत्कालीन व्यवस्थापन - 40 लाख 
कोंडवाड्यावरील खर्च - 20 लाख 
वृक्षारोपणासाठी खर्च - 20 लाख 
हिवताप प्रतिबंधक योजना - 35 लाख 
कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी - 2 कोटी 50 लाख 
मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त - 1 कोटी 10 लाख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dress Code: कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा; राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोणत्या कपड्यांवर बंदी? जाणून घ्या...

Mumbai News: मुंबईकरांना मोठा दिलासा! मढ ते वर्सोवा अवघ्या १० मिनिटांत पोहोचणार; केबल पूल लवकरच सुरु होणार

Nashik Municipal Election : निवडणुकीपूर्वीच उमेदवारांना महागाईचा झटका! चहा-नाश्त्यापासून बॅनरपर्यंतचे नवीन दर जाहीर

Kagal Accident : महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रकने कार, दोन बैलगाड्या आणि मोटरसायकल चिरडल्या...

Ichalkaranji Municipal : इचलकरंजीच्या राजकारणात मोठा बदल; महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ‘हात’ चिन्ह गायब

SCROLL FOR NEXT