राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत साहित्यवाटप
राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत साहित्यवाटप sakal
अहमदनगर

अहमदनगर : जिल्हा परिषदेत टक्केवारीचे राजकारण

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: जिल्हा परिषदेची सत्ता यांच्या ताब्यात होती. मात्र, टक्केवारी खाण्याशिवाय यांनी काहीच केले नाही. टक्केवारी खाण्याची संस्कृती जिल्हा परिषदेत यापूर्वी नव्हती, अशी टीका खासदार डॉ. सुजय विखे यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा नामोल्लेख टाळून केली.

विजय लॉन्समध्ये राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. बऱ्याच कालावधीनंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या आमदार मोनिका राजळे व विखे यांनी या वेळी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळली. या वेळी मोनिका राजळे, अरुण मुंढे, राहुल राजळे, माणिक खेडकर, गोकुळ दौंड, अभय आव्हाड, डॉ. मृत्युंजय गर्जे, नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, अजय रक्ताटे, बापूसाहेब भोसले, कचरू चोथे, भीमराव फुंदे यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना विखे म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या शाळा झाडाखाली भरतात, मात्र खोल्या बांधण्यासाठीसुद्धा टक्केवारी घेतली जाते. जे बंधारे बांधले, ते वाहून गेले आहेत.

जिल्ह्यात नात्यागोत्याचे राजकारण सुरू झाल्याने विरोधात बोलायला कोणी नाही. मी व आमदार राजळे पडायला हवे, असे त्यांना वाटते. वयोश्री योजनेची काहींनी खिल्ली उडवली. मात्र, या योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी, आपल्याला मिळालेले साहित्य गावात जाऊन जे खिल्ली उडवत होते त्यांना दाखवावे. या योजनेसाठी नरेंद्र मोदी यांनी २५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ज्यांच्याकडे पैसे नाहीत, त्यांची काळजी मोदी यांना असल्याने, आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर आणा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अजय रक्ताटे यांनी केले. आभार माणिक खेडकर यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT