ahmednagar  sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : स्कूल मॅपिंग न केल्यास पगार रोखणार; गळतीने गुरुजींना अतिरिक्तची भीती

मराठी आणि उर्दू माध्यमातील पदवीधर शिक्षकांची तब्बल ४३३ रिक्त पदे आहेत.

अशोक निंबाळकर

अहमदनगर - जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी संख्येला गळती लागलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल साडेसात हजारांनी पटसंख्या घटली. परिणामी दोन वर्षांत १९ शाळांना कुलूप लावावे लागले. तब्बल २८४ गुरुजी अतिरिक्त ठरले. सध्या ते त्याच शाळांवर काम करीत असल्याने समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या शिक्षकांनी स्कूल मॅपिंग न केल्यास त्यांचा या महिन्याचा पगार थांबणार आहे.

झेडपीच्या शाळांतील पटसंख्या विविध कारणांनी रोडावत आहे. मराठी आणि उर्दू माध्यमातील पदवीधर शिक्षकांची तब्बल ४३३ रिक्त पदे आहेत. उपाध्यापकांचीही ९५ अशी एकूण ५२८ पदे रिक्त आहेत. झेडपीच्या शाळेत सध्या सव्वादोन लाख विद्यार्थी आहेत.

शाळेत पदवीधर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते, अशी पालकांची धारणा आहे. त्यातूनच पटसंख्येला गळती लागल्याचे शिक्षणक्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जादा तास घेतले जातात. इतर गुणवत्तावाढीसाठीही शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसते. १ ते ५ पटसंख्येच्या १९ शाळा बंद झाल्याने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. वीस पटसंख्येच्या आतील १६१ शाळा रडारवर आहेत.एकीकडे रिक्त आणि दुसरीकडे अतिरिक्त, अशी परिस्थिती आहे.

संचमान्यतेप्रमाणे शालार्थ प्रणालीमध्ये पोस्ट मॅपिंग झाले नाही. त्यामुळे शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाला पोस्ट मॅपिंग करण्याचा आदेश दिला आहे. संचमान्यतेच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संचमान्यतेप्रमाणे मंजूर पदानुसार शालार्थ प्रणालीत कार्यरत शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पोस्ट मॅपिंगची सुविधा दिली होती, परंतु ते काम झाले नाही. हे काम न झाल्यास सप्टेंबर महिन्याचे वेतन बिल निघणार नसल्याचे बजावले आहे.

रिक्त, अतिरिक्त

पटसंख्या गळतीमुळे २८४ उपाध्यापक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पदवीधर शिक्षकांच्या रिक्त जागांचा आकडा मोठा आहे. त्यांचे अतिरिक्तचे प्रमाण कमी आहे. तालुकानिहाय अतिरिक्त ठरलेली उपाध्यापकांची संख्या ः अकोले - १९, संगमनेर - ३३, कोपरगाव - १२, श्रीरामपूर - ७, राहाता १४, राहुरी - ०, नेवासे - ३९, शेवगाव - १८, पाथर्डी - ३५, जामखेड - १६, कर्जत - १८, श्रीगोंदे - ३२, पारनेर - ९, नगर - १६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT