Nagpur Esakal
अहिल्यानगर

Ahmednagar: कैद्याला अचानक झाला श्वसनाचा त्रास, वैद्यकीय तपासणीसाठी नेताच ठोकली धूम

शेवगाव पोलिस ठाण्यातून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. त्यानंतर राबवलेल्या शोधमोहिमेत त्यास पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

Manoj Bhalerao

Prisoner Ran Away From Police Custody : शेवगाव पोलिस ठाण्यातून ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलेल्या आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्या. त्यानंतर राबवलेल्या शोधमोहिमेत त्यास पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. हा प्रकार आज दुपारी एकच्या सुमारास घडला.

मुज्जू ऊर्फ मुद्दसर साजीद सय्यद (वय १९, रा. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. शेवगाव शहरातील ईदगाह मैदान येथे दोन गटांत हाणामारी झल्याची घटना शुक्रवारी (ता.२२) घडली होती. याबाबत एका गटातील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातील परवेज मेहबूब शेख, मुज्जू ऊर्फ मुद्दसर साजीद सय्यद, अरमान ऊर्फ सर्फराज गणी पिंजारी या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली.

आज शनिवारी वैद्यकीय तपासणीसाठी या तिघांना पोलिसांच्या वाहनातून गेवराई रस्त्यावरील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे परवेज शेख यास श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तो खाली पडला. याचा फायदा घेत यातील आरोपी मुज्जू सय्यद याने पोलिसांच्या तावडीतून धूम ठोकत बाजरीच्या शेतात लपून बसला. (Latest Marathi News )

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे हे तातडीने तेथे फौजफाट्यासह दाखल झाले. त्यांनी राबविलेल्या शोधमहिमेत ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील बाजरीच्या पिकात आरोपी लपून बसल्याचे निर्दशनास येताच पोलिसांनी त्यास पकडले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर मारुती सानप यांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, शेवगाव शहरातील ईदगाह मैदान येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन गटांत हाणामारी झाली. हर्षद अल्ताफ इनामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून झहीर ऊर्फ जज्जा शेख, मुज्जू ऊर्फ मुद्दसर सय्यद, पापा ऊर्फ परवेज शेख, अरमान शेख, शाहरूख शेख, वसीम शेख (रा. पाथर्डी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT