Shirdi Esakal
अहिल्यानगर

Shirdi Spiritual Tourism: देशाच्या अध्यात्मिक पर्यटनस्थळात शिर्डीचे स्थान महत्त्वाचे, पत्रकारांच्या कार्यशाळेत आशावाद

देशाच्या अध्यात्मिक पर्यटनस्थळात शिर्डीचे स्थान महत्त्वाचे आहे. येत्या काही वर्षांत शिर्डीच्या सर्वांगीण विकासाला गती येईल, असा आशावाद आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

Shirdi as a Spiritual Tourism: देशाच्या अध्यात्मिक पर्यटनस्थळात शिर्डीचे स्थान महत्त्वाचे आहे. येत्या काही वर्षांत शिर्डीच्या सर्वांगीण विकासाला गती येईल, असा आशावाद आज येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांच्या कार्यशाळेत व्यक्त करण्यात आला.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने ‘अध्यात्मिक पर्यटनाचे आर्थिक व सामाजिक परिणाम’ या विषयावर ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, साईसंस्थानचे उपमुख्य कार्याकारी तुकाराम हुलावळे, पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, पत्र सूचना कार्यालयाचे महेश अय्यंगार आणि पत्रकार डॉ. रवींद्र चिंचोलीकर उपस्थित होते.

कोळेकर म्हणाले की, समृद्धी महामार्ग, नव्याने उभारली जात असलेली शिर्डी औद्योगिक वसाहत, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, पशुमहाविद्यालय, लोहमार्ग व विमानतळाचे सुरू असलेले विस्तारीकरण, यामुळे शिर्डीच्या विकासाला आणि येथील अध्यात्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. पुढील दहा वर्षांत शिर्डीचा झपाट्याने विकास होईल.(Latest Marathi News)

साईसंस्थानने विविध राज्यांतील पर्यटन महामंडळांसोबत परस्पर सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून येणाऱ्या भाविकांना साईदर्शनाबरोबरच भोवतालच्या धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे सुचविता येईल. प्रवासी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत देखील आपण बैठक घेतली. अध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी हे उपक्रम उपयुक्त ठरतील, असे हुलावळे यांनी सांगितले.

पोलिस उपअधीक्षक वमने म्हणाले की, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क असते. विकास सुरू झाला की फसवणूक व गुन्हेगारीत देखील वाढ होते. एमटीडीसीचे नाशिक विभागीय प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण व पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक महेश अयंगार व माध्यम अधिकारी हर्षल आकुडे, यांनीही मार्गदर्शन केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Red Alert : मुंबईला पावसाचा तडाखा! कांदिवली, मालाडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; हवामान खात्याकडून 'रेड अलर्ट' जारी, पुढील 3 तास महत्त्वाचे

Maharashtra Government Decision : मोठा निर्णय! राज्यातील २९ जिल्ह्यांत नवीन अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालये होणार; सामान्यांचा वेळ, पैसा, त्रास वाचणार

Latest Marathi News Live Update : भर पावसात वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण

Chhatrapati Sambhajinagar: अनेक मंत्र्यांशी संबंध, अन्न व नागरी पुरवठा विभागात नोकरी लावतो; तरुणाला २१ लाखांना गंडा

Mumbai Rain: पहिल्याच पावसाने मुंबईची पोलखोल! वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली; नेमकं कुठे आणि काय घडलं?

SCROLL FOR NEXT