Bodhegaon 
अहिल्यानगर

Ahmednagar : संभाजी महाराजांच्या मिरवणुकीवर दगडफेक! बोधेगावात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा

बोधेगाव : शेवगाव हे पुरोगामी विचारांचे शहर आहे. या ठिकाणची परंपरा एकमेकांना समजून घेण्याची असताना, शांततामय वातावरणात निघालेल्या संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तच्या मिरवणुकीवर भ्याड हल्ला झाला. या पार्श्वभूमीवर बोधेगाव (ता. शेवगाव) येथे सर्व व्यापारी व ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारी (ता. १९) कडकडीत बंद पाळत निषेध व्यक्त करण्यात आला.

शेवगाव येथे रविवारी (ता. १४) रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या शांततामय मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी हल्ला करून जातीय तेढ निर्माण केली. ज्यांचा काहीच संबंध नाही, अशा छोट्या-मोठ्या दुकानांवर, तसेच दुचाकी- तीनचाकी, चार चारचाकी वाहनांवर दगडफेक करून मोठे नुकसान करण्यात आल्याने, शेवगावातील व्यावसायिकांनी ४ दिवस बंद पाळत, आरोपींना अटक करून कारवाईची मागणी केली होती.

त्यानुसार ११२ पैकी ४५ आरोपींना गजाआड केल्यानंतर उर्वरितांवर कारवाई आणि अवैध व्यवसाय बंद करण्याच्या प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर बंद मागे घेण्यात आला. घटनेच्या निषेधार्थ सकाळी सहापासून सायंकाळी सहापर्यंत बोधेगाव, तसेच बालमटाकळीतही कडकडीत बंद पाण्यात आला होता.

यावेळी समाजकंटक आणि त्यांना साथ देणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, याकरिता बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे नानासाहेब गर्जे, पोलिस नाईक संतोष धोत्रे यांना बोधेगावातील सकल हिंदू समाजातर्फे निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT