राजू शेट्टी sakal
अहिल्यानगर

Ahmednagar : साखर सम्राट पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर ; राजू शेट्टी

टाकळीमियाँ येथे ऊस परिषद

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : राज्यातील दोनशे साखर कारखान्यांनी काटा मारीत एक कोटी ३२ लाख टन ऊसावर डल्ला मारुन ४ हजार ६०० कोटींचा दरोडा घातला. साखर उतारा, मोलॅसेस, इथेनॉलमध्ये चोऱ्या करून, ऊस दरात फटका देणारे दोनशे साखर सम्राट पांढऱ्या कपड्यातील दरोडेखोर आहेत. त्यांना साडेतीन कोटी ऊस उत्पादक शेतकरी वठणीवर आणतील, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. टाकळीमियाँ येथे ऊस परिषदेमध्ये शेट्टी बोलत होते.

अध्यक्षस्थानी ॲड. रावसाहेब करपे होते. स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालिंदर पाटील, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, अनंत निकम, जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे, सुनील लोंढे, बाळासाहेब जाधव, अमृत धुमाळ, शामराव निमसे, उपसरपंच किशोर मोरे, सुभाष करपे, दत्तात्रय आढाव, संतोष चोळके, जितेंद्र शिंदे उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, की साखर उतारा चोरून, बिनशिक्क्याची साखर पोत्यांची मध्यरात्री कारखान्यातून वाहतूक होते. कोल्हापूर जिल्ह्यात २९०० ते ३३०० पर्यंत ऊस दर मिळतो. अहमदनगर जिल्ह्यात २१०० ते २४०० एवढा कमी ऊसदर मिळतो. महागाईचा आगडोंब उसळला. परंतु, दहा वर्षांपूर्वीचा ऊसदर आजही तोच आहे. व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला. तरच योग्य ऊसदर मिळेल. राजकीय विरोधक विखे-थोरात यांचे ऊसदर कमी देण्यावर एकमत असते.

राज्यातील सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करून, त्यावर साखर आयुक्तांचे नियंत्रण असावे. मागील वर्षीची एफआरपी अधिक दोनशे रुपये, यंदाच्या वर्षी एकरकमी एफआरपी अधिक तीनशे पन्नास रुपये मिळावेत. स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळातर्फे राज्यातील नऊ लाख ऊस तोडणी मजुरांची नोंदणी करावी. शेतकरी, ऊस तोडणी मजुरांची लूटमार करणारे मुकादम वगळून महामंडळातर्फे साखर कारखान्यांना मजूर पुरवावेत. अशा विविध मागण्यांसाठी सात नोव्हेंबर रोजी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा होईल.

शासनाने मागण्या मान्य केल्या नाही. तर, सतरा व अठरा नोव्हेंबर रोजी राज्यभरात ऊस वाहतूक बंद करून, दोन दिवस साखर कारखाने बंद पाडले जातील.

- राजू शेट्टी, माजी खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : दारूच्या नशेत एसटी चालवली! पंढरपूरवरून परतणाऱ्या चालक-वाहकाची चौकशी होणार

Nashik Crime : पोलिस असल्याचे सांगून’ ७० वर्षीय वृद्धेच्या दागिन्यांवर डल्ला

Weekly Numerology Prediction : कुणाला अचानक धनलाभ तर कुणाला मिळणार यश, कसा जाईल 14 ते 20 जुलैचा आठवडा; जाणून घ्या भविष्य

1961 Panshet Dam Break: अंगावर काटा आणणाऱ्या आठवणी, प्रत्येक पुणेकराने ऐका । Pune News

Wildlife: पैनगंगाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याच्या हालचालींना वेग; भारतीय वन्यजीव संस्थेनेही केली होती केंद्राला शिफारस

SCROLL FOR NEXT