दोन गटांत हाणामारी sakal
अहिल्यानगर

अहमदनगर : घोसपुरीत दोन गटांत तुफान हाणामारी

एकमेकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर: घोसपुरी (ता. नगर) येथे सोमवारी (ता. नऊ)दुपारी तुफान हाणामारी झाली. एकमेकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या. या हाणामारीत एका लष्करी जवानाचा समावेश असून, पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

घोसपुरी येथे कव्हाणे व शेख या दोन कुटुंबांमध्ये सोमवारी (ता. नऊ) दुपारी साडेतीनच्या सुमारास धुमश्चक्री उडाली. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांच्या घरांवर दगडफेक केली. या दगडफेकीत दोन्ही गटांतील महिला व पुरुष जखमी झाले. त्यानंतर गावातील काही ग्रामस्थांनी हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिटला नाही. त्यानंतर रात्री उशिरा नगर तालुका पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या. एका गटातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी बलात्कार करून तलवारीने मारहाण करीत घरावर दगडफेक केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. दुसरी फिर्याद दुसऱ्या गटातील महिलेने दिली आहे. ती घरात एकटी असताना आरोपी दोघांनी घरात घुसून विनयभंग केला. घरावर दगडफेक केली. यातील चारही आरोपींना पोलिसांनी सोमवारी (ता. नऊ) रात्रीच अटक केली. एका गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक युवराज चव्हाण, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक रणजित मारन करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदेकरला मत, विकासाला मत! तोंडाला बुरखा, हातात दोर बांधलेला; घोषणा देत बंडू आंदेकरसह लक्ष्मी, सोनालीने भरला अर्ज

BMC Electikon: कलानी गटाचा शिंदेसेनेत विलीन होणार? उमेदवार धनुष्यबाणावर निवडणूक लढणार

राजधानी हादरली! 'मसाज पार्लर'मध्ये काम करणाऱ्या पत्नीची तिसऱ्या पतीकडून निर्घृण हत्या; तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न, चारित्र्यावर होता संशय

Latest Marathi News Live Update : गुंड बंडू आंदेकर निवडणुकीचा अर्ज भरण्यास दाखल!

Dhutpapeshwar : शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या धूतपापेश्वर मंदिराला नवा साज; ११ कोटींच्या सुशोभीकरणाने भाविक मंत्रमुग्ध

SCROLL FOR NEXT