maharashtra police sakal
अहिल्यानगर

अहमदनगरमध्ये थर्टी फर्स्टच्या दरम्यान असणार ८०० पोलिसांचा बंदोबस्त

ओमिक्रॉनचा वाढलेला धोका, यामुळे सरकारने नागरिकांवर काही निर्बंध घातले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

ओमिक्रॉनचा वाढलेला धोका, यामुळे सरकारने नागरिकांवर काही निर्बंध घातले आहेत.

अहमदनगर : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे(new year) स्वागत सर्वत्र जल्लोषात केले जात आहे. कोरोनाचा(corona) वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. ८०० पोलिस अधिकारी-कर्मचारी(800 police) तैनात करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन करणाऱ्यांविरोधा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला. (sp manoj patil)पोलिस अधीक्षक पाटील यांनी पत्रकार परिषद (press conference)घेऊन थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्‍वभूमीवरील पोलिस बंदोबस्ताची माहिती दिली.

पाटील म्हणाले की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ओमिक्रॉनचा वाढलेला धोका, यामुळे सरकारने नागरिकांवर काही निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी (ता. ३१) थर्टी फर्स्ट आणि शनिवारी (ता.१) नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे.अधीक्षक पाटील म्हणाले, करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने जे नियम लागू केले आहेत, त्या नियमांचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पालन करावे. सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, पार्ट्या करणे, रात्री-अपरात्री नियमबाह्य पद्धतीने फटाके वाजवणे या सर्वांवर निर्बंध लावण्यात आले आहे.

नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करूनच सरत्या वर्षाला निरोप द्यावा व नवीन वर्षाचे स्वागत करावे. नवीन वर्षाची सुरूवात चांगल्या पद्धतीने व्हावी. कोरोनाचा प्रार्दुभाव पसरणार नाही, याची काळजी घ्यावी.दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची शक्‍यता असल्याने यावर पोलिसांची नजर असणार आहे. पार्ट्या करणे, गर्दी जमवणे किंवा रात्रीच्यावेळी दारू पिऊन वेगात वाहने चालविणे यावर पोलिस लक्ष ठेवणार आहेत. आज थर्टी फर्स्टच्या दिवशी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.

दारू पिणाऱ्यांवर होणार कारवाई

रात्रीच्या वेळेस दारू पिऊन वाहने चालविणे, वेगात वाहने चालविणे, इतर लोकांना त्रास होईल अशा पध्दतीने गैरवर्तन करणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिसही रस्त्यांवर तैनात राहणार आहेत. त्यांच्याकडूनही कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT