अकोले : किसान सभेचा सोयाबीन ओतून केंद्र सरकारचा केला निषेध sakal
अहिल्यानगर

अकोले : किसान सभेचा सोयाबीन ओतून केंद्र सरकारचा केला निषेध

केंद्र सरकारने सोयाबीनच्या हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन जी. एम. सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण

सकाळ वृत्तसेवा

अकोले : सोयाबीनचे दर 11 हजार 111 रुपयांवरून कोसळून केवळ 20 दिवसांमध्ये 4000 रुपयांपर्यंत खाली आल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेने सापडले आहेत....केंद्र सरकारने सोयाबीनच्या हंगामाच्या तोंडावर 12 लाख टन जी. एम. सोया पेंड आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सोयाबीनच्या दराची घसरण झाली. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किसान सभे सह विविध संघटना एकत्र येत अकोले येथे तहसील कार्यालया समोर सोयाबीन ओतून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

सोयाबीन उत्पादकांना न्याय द्यावा, ही प्रमुख मागणी या मोर्चात कण्यात आली.

किसान सभेसह विविध संघटना एकत्र येत किसान सभा राज्य सरचिटणीस डाॅ.अजित नवले यांच्या उपस्थितीत अकोले तहसील कार्यालयांवर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करत सोयाबीन तहसील कार्यल्यासमोर ओतून केंद्र सरकाने घेतलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधातल्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

केंद्र सरकारने 12 लाख टन सोयाबीनची आयात तातडीने थांबवावी, सोयाबीन उत्पादकांना न्याय द्यावा, ही प्रमुख मागणी या मोर्चात कण्यात आली. तीन काळे कायदे रद्द करावे या सह इतर मागण्या घेऊन किसान सभेच्या वतीने तहसील कार्यल्यावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून टाकला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo: इंडिगोचं चाललंय काय? 300 पेक्षा जास्त विमानं रद्द; DGCA पासून मंत्रालयापर्यंत बैठकांचा धडाका, आतापर्यंतचे सर्व अपडेट्स

Latest Marathi News Live Update : श्री दत्तात्रयांचे आजोळ असलेल्या कर्दमाश्रमात श्रीदत्त जयंती निमित्त भाविकांची मांदीयाळी

Ashes: हुश्श, विवस्त्र होण्यापासून वाचलो! शतक केलं जो रुटने, पण प्रचंड आनंदी झाला ऑस्ट्रेलियाचा हेडन; पाहा Video

Wakad Bus Accident : वाकडमध्ये पुन्हा मद्यधुंद बसचालकाचा कहर; विरुद्ध दिशेने येत मोटार व रिक्षेला जोरदार धडक; मोटारचालक जखमी; बसचालकावर गुन्हा दाखल!

Ashes: जो रूटचं ऑस्ट्रेलियात पहिलंच शतक! ४० व्या सेंच्युरीनंतर खास सेलिब्रेशनही केलं; पण स्टार्कनेही ६ विकेट्ससह मैदान गाजवलं

SCROLL FOR NEXT