विधवा प्रथेला मूठमाती
विधवा प्रथेला मूठमाती sakal
अहमदनगर

अकोले : रुंभोडीतही विधवा प्रथेला मूठमाती

सकाळ वृत्तसेवा

अकोले : हेरवाड (कोल्हापूर) ग्रामपंचायतीने राज्यात पहिल्यांदा विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. हेरवाड ग्रामपंचायतीच्या निर्णयाचे अनुकरण करीत तालुक्यातील रुंभोडी ग्रामपंचायतीनेही ग्रामसभेत, गावातून विधवा प्रथा बंद करण्याचा एकमुखी ठराव घेतला. असा ठराव घेणारी रुंभोडी ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढणे यांसारख्या प्रथांचे आजही पालन केले जाते. तसेच, विधवा महिलेला कोणत्याही धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत सहभाग दिला जात नाही. कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारावर गदा येत असल्याने ही अनिष्ट प्रथा बंद करण्याचा व प्रबोधन करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.

माजी सरपंच शांताराम मालुंजकर यांनी या ठरावानंतर आता गावात प्रबोधन करण्याची गरज आहे, असे सांगितले. सखूबाई सावंत यांनी या ठरावाबद्दल समाधान व्यक्त करून धार्मिक कार्यात विधवा, परित्यक्ता महिलांना जी सापत्नपणाची वागणूक दिली जाते त्याचे कथन केले. यावेळी कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे हेरंब कुलकर्णी, ललित छल्लारे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठरावाबद्दल सरपंच मालुंजकर यांचा सत्कार केला. यावेळी उपसरपंच इंदिरा मालुंजकर, पोलिस पाटील गोरक्ष शिंदे, ग्रामसेवक एस. एस. एरंडे, सदस्य रमेश सावंत, संगीता मालुंजकर, भाऊसाहेब मधे व ग्रामस्थ उपस्थित होते.

ठरावाची गावात काटेकोर अंमलबजावणी करू. सर्वच महिलांना गावात सन्मानानेच वागविले जाईल. तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींनीही हे ठराव करावेत, यासाठी सरपंच परिषदेमार्फत प्रयत्न करू.

रवींद्र मालुंजकर, सरपंच

पुरोगामी निर्णय घेण्यात रुंभोडी गावाने तालुक्याचे आजपर्यंत नेतृत्व केले आहे. त्यामुळे हा ठराव सर्वप्रथम रुंभोडीने केल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हा विचार प्रसारित होईल.

हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT