https://www.esakal.com/ahmednagar/former-mla-kardile-wins-burhannagar-399749 
अहिल्यानगर

वांगदरी नागवडे बापूंच्या कुटुंबासोबतच, सर्वच्या सर्व जागांवर विजय

संजय आ. काटे

श्रीगोंदे : वांगदरी ग्रामपंचायत निवडणुकीत गेल्या वेळी विरोधकांनी काही जागा जिंकून नागवडे गटाच्या वर्चस्वाला सुरुंग लावला होता. मात्र, यंदा राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे यांनी घातलेली साद मतदारांनी उचलून धरीत 13 पैकी 12 जागा जिंकून देत ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे यांच्या 87व्या जयंतीनिमित्त अनोखी आदरांजली वाहिली. 

वांगदरी येथे बापू व त्यांचे बंधू विठ्ठलराव नागवडे यांच्या शब्दांवर गावकरी चालत. बापू असतानाही विठ्ठलराव यांच्या हाती गावाची सगळी सूत्रे होती. प्रत्येक निवडणुकीत नागवडे यांचेच वर्चस्व राहिले. मात्र, गेल्या निवडणुकीत चार जागा जिंकत विरोधकांनी धक्का दिला होता. बापूंच्या निधनानंतर व विठ्ठलराव नागवडे यांच्या आजारपणात गावचा कारभार राजेंद्र नागवडे यांनी हाती घेतला.

यंदाच्या निवडणुकीत त्यांनी जातीने लक्ष दिले.प्रत्येकाच्या घरी जाऊन, गेल्या वेळची चूक करू नका, असे आवाहन केले. 
भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे व आपचे नेते राजेंद्र निळकंठ नागवडे यांनी पॅनल करीत आव्हान दिले. निवडणूक शांततेत पार पाडण्यात विरोधकांची भूमिका महत्त्वाची ठरली. मात्र, मतदारांनी विरोधकांना नाकारले, यापेक्षा नागवडे कुटुंबाला सोबत करण्याची भूमिका घेतल्याचे दिसले. अहमदनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT