An alternative to the PPE kit invented 
अहिल्यानगर

कोरोनाची भीती ः सलूनचालकांनी केला पीपीई किटचा असाही जुगाड...

सुहास वैद्य

कोल्हार : कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळात तीन महिने बंद राहिलेली केशकर्तनालये एकदाची उघडली. रोजीरोटीचा धंदा सुरू झाल्यामुळे नाभिक व्यावसायिकांना दिलासा मिळाला; मात्र ग्रामपंचायत व नाभिक संघटनेने ठरवून दिलेल्या अटी-शर्तींनुसार व्यवसाय करावा लागणार आहे.

महागडे पीपीई किट परवडत नसल्याने, केशकर्तनालयांच्या चालकांनी त्यावर जुगाड शोधला. पीपीई किटऐवजी 300 ते 500 रुपयांपर्यंत रेनकोट व तोंडावर फेसशिल्ड लावून दाढी-कटिंगचे काम सुरू आहे. अर्थात, काही ठरावीक दुकानदारांनीच असा पर्याय शोधला. काही जण अजूनही बेफिकीर असल्याचे दिसते.

केशकर्तनालये सुरू करताना सुरक्षित अंतर, अंगावर पीपीई किटसारखा पोशाख, चेहऱ्यावर मास्क लावणे, ग्राहकांच्या अंगावर सॅनिटायझर फवारणी, ग्राहकांनी स्वतःचे ऍप्रन, टॉवेल, नॅपकिन, तसेच दाढी-कटिंगपूर्वी वॉश बेसिनमध्ये हात धुऊनच खुर्चीवर बसणे, दाढी-कटिंगचे साहित्य सॅनिटाइझ करणे, दुकानात किंवा बाहेर बसताना चेहऱ्याला मास्क लावणे, ग्राहकाचे नाव, गाव व मोबाईल क्रमांक आदींच्या नोंदी ठेवणे, अशी नियमावली केशकर्तनालय चालकांसाठी बंधनकारक केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सलूनचालकांनी रेनकोट वापरून पीपीई किटचा जुगाड केला  आहे. मात्र, त्याचे पालन काही ठरावीक दुकानदारच करताना दिसतात.

लॉकडाउनच्या काळात बंद असलेली केशकर्तनालये शुक्रवारपासून (ता. 22) उघडली. "बंद'च्या काळात काही केशकर्तनालय चालकांनी व त्यांच्या हाताखालील कारागिरांनी थेट ग्राहकांच्या घरी जाऊन, अगदी वाड्या-वस्त्यांवर जाऊन दाढी-कटिंगची कामे केली. अन्य दुकाने सुरू झाली तरी ग्राहकांशी थेट जवळून संपर्क येत असल्याने केशकर्तनालये उघडण्यासाठी परवानगीस जास्त काळ लागला. आता ही दुकाने उघडली असून, सुरक्षित अंतर ठेवून केशकर्तनाचे काम सुरू झाले आहे. 

केशकर्तनालयामध्ये वापरत असलेले रेनकोट कोरोनाप्रतिबंधक नाहीत. ते पूर्णपणे संरक्षण देऊ शकत नाहीत. त्यावर कोरोना विषाणू दोन तास जिवंत राहू शकतो. डॉक्‍टर वापरत असलेले पीपीई किट आयसीएमआर मान्यताप्राप्त असून, तीच पूर्ण सुरक्षित आहेत. 
- डॉ. संजय घोलप, मुख्य वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोल्हार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT