D.Ed. Twenty years after meeting college students
D.Ed. Twenty years after meeting college students 
अहमदनगर

वीस वर्षांनी भेटले गुरूजी, आनंदाला आलं उधाण

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : यशवंतराव गाडे पा.(महाराष्ट्र) अध्यापक विद्यालयातील 2001-2003 या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन स्नेहमेळावा घेण्याचे नियोजन केले. शिक्षक व माजी विद्यार्थी यांचा हा स्नेहमेळावा (ता. 13) जानेवारी रोजी यशवंतराव गाडे पा. (महाराष्ट्र) अध्यापक विद्यालयात उत्साहात झाला. काही निवृत्त प्राध्यापकांनाही आवर्जून बोलावून त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. तब्बल 18 वर्षानंतर विद्यार्थी एकत्र येत असल्यामुळे प्रत्येकाच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता. 

जुन्या आठवणींच्या चर्चा, गप्पा, विनोद, खोड्या, किस्से व हास्य कल्लोळाने हा मेळावा रंगत गेला. आपल्या मित्र-मैत्रिणींची व शिक्षकांची भेट झाल्याने एक वेगळा आनंद सारेच अनुभवत होते. अनेक जण ऋणानुबंध जपत भूतकाळात रमून गेले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या सुमन धिरडे उपस्थित होत्या. तसेच प्रा. उत्तम राजळे, प्रा. मनोरमा काटे, निवृत्त प्रा.पुष्पा मरकड, निवृत्त प्रा.वसंतराव जगताप, निवृत्त प्रा. सर्जेराव म्हस्के, प्रदीप म्हस्के आदी उपस्थित होते.

यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देत, आपले मनोगत व्यक्त करून कॉलेजमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व प्राध्यापकांनी  माजी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करा तसेच आपल्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडवा असे प्रा. वसंत जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.  

तुम्ही सर्वजण खूप चांगले काम करत आहात, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून काहीतरी नाविन्यपूर्ण नवीन प्रयोग शिक्षणक्षेत्रात करावेत, असे प्रा. पुष्पा मरकड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

जुनी मूल्यमापन पद्धती कशा प्रकारे योग्य होती व तीच पद्धत ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे प्रा. सर्जेराव म्हस्के यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

यानंतर एकत्रित स्नेहभोजन कार्यक्रम झाला. यावेळी किरण बेरड, गणेश शिंगोटे, दत्तात्रय झगडे, शशिकांत खंडागळे, प्रशांत भुजबळ, राजेश दुरगुडे, शिवाजी हुलवळे, किशोर गर्जे, योगेश भोस, मोहन मुळे, शिवाजी पाखरे, देविदास शिंदे, किशोर गीते, सचिन परांडे, श्रीराम लाळगे, इरफान शेख, हरीश हातवटे, मनीषा गोरे, मीरा गव्हाणे, जया चौधरी, मंदा आरोटे, जयश्री मते, शमीना शेख आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन परांडे यांनी केले तर आभार श्रीराम लाळगे यांनी मानले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील फास्ट फूडची दुकाने आगीत जळाली

SCROLL FOR NEXT