Anil Rathod passed away due to cardiac arrest in Nagar 
अहिल्यानगर

भैया गेले... माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

अशोक निंबाळकर

अहमदनगर: शिवसेनेचे उपनेते, माजी मंत्री अनिल राठोड यांचे बुधवारी पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले. गेल्या आठवड्यात त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. आज सकाळी साडेदहा वाजता त्यांच्या पार्थिवावार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नगर शहराच्या आमदारकीची धुरा त्यांनी २५ वर्षे सांभाळळी. शिवसेनेचा वाघ असाच त्यांचा लौकिक होता. मोबाईल आमदार म्हणून त्यांची ख्याती होती. सभा चालू असतानाही ते मोबाईल रिसिव्ह करीत असत. समोरचा सभेत भैया बोलत आहेत असा समजायचा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना नगर शहरात येऊन त्यांनी इतकी वर्षे जनसेवा केली. कोणत्याही किरकोळ कारणासाठी ते लोकांसाठी धावून जात.

राठोड कुटुंब हे मूळ राजस्थानातील आहे. त्यांचे वडील नगरमध्ये स्थायिक झाले. १२ मार्च १९५० रोजी अनिल राठोड यांचा जन्म झाला. पुढे त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. वडिलांच्या व्यवसायात मदत केली. त्यांना वकील व्हायचे होते. परंतु कौटुंबिक जबाबदारीमुळे त्यांना ते शिक्षण अर्धवटच सोडावे लागले. नगरमध्ये त्यांनी प्रारंभीच्या काळात पावभाजी सेंटर सुरू केले होते. त्यातून त्यांचा लोकांसोबत संपर्क येत गेला. हिंदू एकता आंदोलनात ते सहभागी झाले. शिवसेनेने त्यांच्यातील गुण हेरले आणि शहर प्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली.

शिवसेना वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. पक्षाने त्यांना मंत्रिपदाची संधीही दिली होती. नगर शहरासह जिल्ह्यात ते भैया या टोपण नावाने परिचित होते. नगर जिल्हा साखर सम्राटांचा म्हणून ओळखला जातो. परंतु सर्वत्र राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे आमदार निवडून यायचे. मात्र, नगरमध्ये शिवसेनेची सीट पक्की समजली जायची. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे ते विश्वासू होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी समाजसेवा केली. कोरोना महामारीतही त्यांनी लोकसंपर्क कमी केलेला नव्हता. ते रूग्णालयात दाखल होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची आस्थेने विचारपूस केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे OBC मधूनच Maratha आरक्षणावर ठाम का? स्वतंत्र आरक्षणाला विरोध का? टेक्निकल गोष्ट समजून घ्या...

Service Charge Scam : सेवा शुल्काच्या नावाखाली हॉटेलमध्ये लूट; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर; पाच ते २० टक्क्यांपर्यंत वसुली

Maratha Protest : मराठ्यांच्या वादळाने मुंबईत वाहतूक कोंडी, फ्री वेनंतर जेजे फ्लायओवरही बंद; कोस्टल रोडवर वाहनांच्या रांगा

Pitru Paksha 2025: यंदा 6 कि 7 सप्टेंबर यंदा पितृपक्ष कधी? एका क्लिकवर सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

Marathwada Dams: मोठ्या धरणांच्या साठ्यात दुपटीने वाढ; मराठवाड्यातील स्थिती, मानार, सीना कोळेगाव शंभर टक्के भरले

SCROLL FOR NEXT