Another new front of the Bharatiya Janata Yuva Morcha 
अहिल्यानगर

भारतीय जनता युवा मोर्चाची आणखी एक नवी आघाडी

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून राज्यभरात युवा वाॅरीअर्स हि युवकांची आणखी एक नवी आघाडी उघडण्यास भाजपने सुरवात केली आहे. नगर जिल्ह्यात या पहिल्या आघाडीचा प्रारंभ शिर्डी येथे पक्षाचे उत्तर नगरजिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या हस्ते करण्यात आला. 

या बाबत माहिती देताना वाॅरीअर्स आघाडीचे शिर्डी शहराध्यक्ष योगेश गोंदकर म्हणाले, अठरा ते पंचवीस वयोगटातील युवकांसाठी राज्यभर युवा वाॅरीअर्सच्या शाखा सुरू केल्या जातील. काल शिवजयंतीचे औचित्य साधून सिंहगडावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत(दादा) पाटील व भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रात रूचि असणा-या युवकांचे संघटन या निमित्ताने बांधण्यात येईल. त्यांच्यासाठी विवीध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्याचे राज्यव्यापी नियोजन करण्यात आले आहे. नगर जिल्हात शिर्डीतून त्याचा प्रारंभ करण्यात आला. 
यावेळी राजेश शर्मा, सचिन शिंदे, किरण बोराडे, आघाडीचे उपाध्यक्ष रविंद्र गोंदकर, सुधीर शिंदे व राम आहेर आदि पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शेतकऱ्यांच्या DBT वर दसऱ्यापर्यंत मदत जमा करणार'; अजित पवार यांचे आश्‍वासन, सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीही दिली ग्वाही

Pune Traffic App : वाहनचालकांवर मोबाईलवरूनच कारवाई, ‘पुणे ट्रॅफिक’ ॲपला प्रतिसाद; आतापर्यंत ४२ हजार तक्रारी

Shivram Bhoje Death : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगाव येथे आज होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Updates : ख्यातकीर्त ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे निधन, कसबा सांगावात आज अंत्यसंस्कार

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

SCROLL FOR NEXT