Approval has been given to open another branch of Akhil Bharatiya Marathi Natya Parishad in Ahmednagar.jpg 
अहिल्यानगर

अहमदनगर महानगर'ला मान्यता; अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नगरमध्ये दुसरी शाखा

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या कार्यकारी समितीची बैठक मुंबईत बुधवारी झाली. तिथे नगर शहरात नाट्यपरिषदेची दुसरी शाखा उघडण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार 'अहमदनगर महानगर' या नवीन शाखेस मान्यता दिली असून, तसे पत्र मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांनी दिल्याची माहिती नाट्यकर्मी क्षितिज झावरे यांनी दिली. यापूर्वी नाट्यपरिषदेची नगर जिल्हा शाखा कार्यरत आहे.

महापालिका क्षेत्रात तीन शाखांना कार्य करता येईल, असा नाट्यपरिषदेचा नियम आहे. त्यानुसार शहरातील युवा कलाकार, नाट्यरसिकांनी या शाखेसाठी मागणी केली होती. जिल्ह्यातील नाट्यचळवळ मागील अनेक वर्षांपासून बहरत आहे. राज्य नाट्यस्पर्धा, एकांकिका स्पर्धा, गणपती व नवरात्रातील व्यावसायिक नाट्यप्रयोग, विविध नाट्यप्रशिक्षण शिबिरे व नाट्यविषयक उपक्रमांसह चित्रपटनिर्मिती, मालिकानिर्मिती नगर शहरात होत आहे.

या उपक्रमांतून अनेक युवा कलाकार शहरात निर्माण होत आहेत. शहरातील रसिकवर्गसुद्धा वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील 220 नाट्यरसिकांनी एकत्र येऊन या शाखेची मागणी केली होती. या विनंतीला अध्यक्ष प्रसाद कांबळे आणि मध्यवर्ती कार्यकारी समितीने मान्यता देऊन संक्रांतीनिमित्त गोड भेटच दिली आहे. नवीन शाखेची अस्थायी कार्यकारी समिती लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. मंगळवारी झालेल्या सभेनंतर अभय गोले यांच्या नावे हे मंजुरीचे पत्र संजय लोळगे यांना देण्यात आले. 

नवीन पिढीचे प्रतिनिधी नवीन संकल्पना राबवीत असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. आम्ही त्यांना वेगळे समजत नाही. त्यांना आम्ही सहकार्यच करू. 
- शशिकांत नजान, संस्थापक कार्याध्यक्ष, नगर जिल्हा शाखा, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद 

मराठी नाट्यपरिषदेची दुसरी शाखा नगरमध्ये सुरू होत आहे, ही आनंदाची बाब आहे. त्यावरून नगरमधील सांस्कृतिक व नाट्यचळवळीची व्याप्ती वाढत असून, नगरसाठी ही भूषणावह बाब आहे. 
- पी. डी. कुलकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT