Approve Muslim reservations in the winter session
Approve Muslim reservations in the winter session 
अहमदनगर

हिवाळी अधिवेशनात मुस्लीम आरक्षण मंजूर करा

सुनील गर्जे

नेवासे (अहमदनगर) : मुंबई येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मुस्लीम समाजासाठी दहा टक्के आरक्षण मंजूर करा, अशी मागणी नेवासे येथील मुस्लीम समाजाचे युवा नेते इम्रान दारुवाले यांनी केली आहे. दरम्यान या मागणीचे निवेदनही त्यांनी नेवासे तहसीलदारांना दिले आहे.

युवा नेते इम्रान दारुवाले यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाकडून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना देण्यात आलेल्या निवेदनात,  महाराष्ट्रात मुस्लीम समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आणि आर्थिक स्थिती पाहता समाजास संविधानिक कायदा करून दहा टक्के आरक्षण देण्यात यावे. मुस्लिम आरक्षण कायदा महाराष्ट्रात लागू होईपर्यंत अध्यादेश काढून त्वरित आरक्षण लागू करावे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
२०२० पासून पुढे होणाऱ्या सर्व नोकरी मध्ये दहा टक्के जागा मुस्लीम समाजासाठी राखीव ठेवाव्यात. मुस्लिमांवर होणारे हल्ले, मॉबलिंचीगच्या अपशब्द यांना आळा घालण्यासाठी मुस्लीम समाजाला अँट्रासीटी कायदयाअंतर्गत संरक्षण देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. १४ ते १५ डिसेंबरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा योग्य न्याय न मिळाल्यास समाज रस्त्यावर उतरेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

यावेळी जाकिर शेख, अल्ताफ पठाण, शरीफ शेख, जावेद शेख, अब्बास बागवान, अनिल यादव, जब्बार पिंजारी, फारूक शेख, वसंत दौंड, राजू इनामदार, रियाज़ पठाण, नासिर इनामदार,  जावेद मन्सूरी, शरीफ शेख, सरदार देशमुख  आदी उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT