क्राईम न्यूज ई सकाळ
अहिल्यानगर

स्वस्त धान्याचा काळाबाजार, कर्जत पोलिसांनी केली तिघांना अटक

१० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

दत्ता उकिरडे

राशीन : शिधापत्रिकाधारकांसाठी आलेले स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी घेऊन चाललेल्या तिघांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गहू, तांदूळ व चारचाकी दोन वाहने, असा साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Arrested for selling grain on the black market)

याबाबत सविस्तर माहिती अशी ः राशीन- करमाळा रस्त्यावर स्वस्त धान्य दुकानातील धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांच्या पथकाने सापळा लावला. धान्य घेऊन जाणारी वाहने अडविली.

यावेळी चालकांकडे धान्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांनी वाहनांमधील 55 किलो वजनाच्या तांदळाच्या 72 व गव्हाच्या आठ गोण्यांसह दोन वाहने, असा साडेदहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तसेच बाळासाहेब दादासाहेब ढेरे, रेवणनाथ मुरलीधर ढेरे, श्रीकांत प्रकाश ढेरे (तिघेही रा. वीट, ता. करमाळा) यांना अटक केली.

पथकात पोलिस हवालदार तुळशीदास सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देविदास पळसे, शाहूराज तिकटे यांचा समावेश होता.(Arrested for selling grain on the black market)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagannath Patil: कॅमेरा बंद कर, नाही तर फेकून देईल, भाजपाचे माजी मंत्री पत्रकारांवर संतापले

Dada Bhuse : सन्मानजनक जागा न मिळाल्यास भाजपला डच्चू? दादा भुसे यांनी दिले युतीचे संकेत

बाबो! भाईजानला पाहून सगळेच शॉक! 60 व्या बर्थडेला सलमान खानची सायकलवरुन खास एन्ट्री, नेटकरी म्हणाले...'ये तो अभी जवान...'

Latest Marathi News Live Update : एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिला राजीनामा

Raigad Tourism : रायगड जिल्ह्यात नाताळ आणि नववर्षासाठी पर्यटन स्थळे हाऊसफुल्ल; ऐतिहासिक पर्यटनाची वाढती मागणी!

SCROLL FOR NEXT