atrocity act sakal
अहिल्यानगर

आदिवासींना मारहाणप्रकरणी आश्‍वीत ५ जणांवर ऍट्रॉसिटी

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

आश्वी : किरकोळ कारणातून आदिवासी कुटुंबाच्या घरी जात फिर्यादी व तिच्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून, पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर जातिवाचक शिवीगाळ केली. या पाच जणांविरोधात आश्वी पोलिस ठाण्यात मारहाण व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.(ahmednagar crime news)

याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की गुरुवारी (ता. १३) रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांच्या आश्वी बुद्रुक शिवारातील वस्तीवरील घरी येऊन, अनधिकाराने घरात घुसून यातील आरोपींनी फिर्यादी व तिच्या मुलाला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच, मोबाईल आपटून फोडला.

आमच्या नादी लागल्यास बेत पाहू, अशी धमकी दिली. याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याचे समजताच पुन्हा त्यांच्या घरी जाऊन जातिवाचक शिवीगाळ केल्याचे पुरवणी फिर्यादीत म्हटल्याने, पोलिसांनी लखन मदने, बंटी मदने, अमोल जगताप, लव्हांडे (पूर्ण नाव माहीत नाही) व एक अनोळखी व्यक्ती (सर्व रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) यांच्याविरोधात शि गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: कामाच्या दिवशी लोकलचा मेगाब्लॉक! दोन दिवस रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; नियोजन करून घराबाहेर पडण्याचं आवाहन

Pune: वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हिरवं स्वप्न उद्ध्वस्त; पिंपरे परिसरात पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर

Pune Rave Party Raid : पुण्यात कथित हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर मध्यरात्री छापा, रिसॉर्टमधील दृश्य पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update : बारामतीत कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची हतबलता; ट्रकभर कांदा मेंढ्यांना चारा म्हणून

भूषण प्रधानच्या मनातील ‘स्वप्नसुंदरी’ २४ जुलैला भेटीला येणार! उत्सुकता वाढवणारा टीझर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT