गुन्हा  
अहिल्यानगर

हनुमानवाडीत गुन्हा घडला, तो पोलिसांनी नाही पाहिला

मागील भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडला

विनायक दरंदले

सोनई (अहमदनगर) ः हनुमानवाडी (ता.नेवासे) येथील मुख्य चौकात एका युवकावर तलवार, चाकू व कु-हाडीने वार करत प्राणघातक हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात चार जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attack on a youth in Hanumanwadi)

हनुमानवाडी शिवारात राहत असलेल्या सागर रामचंद्र कुसळकर या युवकावर मागील भांडणाच्या कारणावरुन चार युवकांनी तलवार, चाकू, कु-हाड व लाकडी दांड्याने मारहाण केली. यामध्ये कुसळकर याच्या हात,पाय व अंगावर गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. कुसळकर याच्या फिर्यादीवरुन अमोल राजेंद्र शेजवळ, राहुल चांगदेव शिंदे,अमोल अशोक गडाख (सर्व राहणार-सोनई) अक्षय रामदास चेमटे (राहणार-घोडेगाव) मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शिंदे यास अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात अधिक तपास करीत आहेत.

गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडल्यानंतर आरोपीस अटक करण्याऐवजी सोनई पोलिस तडजोडीत गुंतल्याने गुन्हा उशिरा दाखल झाला. परिणामी यातील अनेक आरोपी वेळ मिळाल्याने फरार झाल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे. तीन दिवसाच्या गौडबंगालानंतर आरोपीची संख्या कमी झाल्याचे बोलले जात आहे. सोनईत घडलेल्या या घटनेबद्दल शनिशिंगणापुर पोलिस ठाण्यातूनही काही युवकांना गुन्हा दाखल करण्याचा धाक दाखविला जात असल्याची माहिती मिळत आहे.(Attack on a youth in Hanumanwadi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT