The ax on the tourism business
The ax on the tourism business 
अहमदनगर

वाचा इथल्या पर्यटन व्यवसायावर कुऱ्हाड 

सकाळ वृत्तसेवा

अकोले : तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. शेजारील ठाणे, मुंबई, नाशिक, पुणे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे भंडारदरा, कळसूबाई, हरिश्‍चंद्रगड, घाटघर परिसर पर्यटकांविना सुनासुना झाला आहे. पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा भिंगार नाल्याजवळील जमिनीमागील ससेमिरा संपेना 

आतापर्यंत जंगल, शेती, मजुरी, मासेमारी, असे नियोजन असलेल्या या भागातील कष्टकऱ्यांना अलीकडे पर्यटनातून थोडे-फार उत्पन्न मिळत होते. त्याचा संसाराला हातभार लागत होता. पावसाळ्यात तर पर्यटकांनी अकोले तालुक्‍यातील निसर्गस्थळे गजबजून जात. रस्ते ओसंडून वाहत. त्यातून मोठ्या प्रमाणात आमदनी होत होती. मात्र, कोरोनाने सगळे गणितच बिघडले. पावसाळा सुरू होऊनही तालुक्‍यातील पर्यटनस्थळे ओस पडली आहेत. 

आवश्‍य वाचा श्रीरामपुरातील मृताच्या कुटुंबातील चौघे बाधित 

रंधा, भंडारदरा, वाकी, मुतखेल, रतनवाडी कोलटेंभे, साम्रद, घाटघर, पांजरे, उडदावणे, मुरशेत, पेंडशेत, बारी, कळसूबाई शिखर आदी निसर्गरम्य पर्यटनस्थळे हिरवाईने नटली आहेत. मात्र, या डोंगररांगांवर येण्यास पर्यटकांना बंदी आहे. पावसाळ्याच्या दोन-अडीच महिन्यांत जवळपास लाखभर पर्यटक येतात. त्यातून हजारो कुटुंबांना रोजगार मिळतो. रिसॉर्टपासून छोट्या हॉटेलचा व्यवसाय पर्यटकांच्या भरवशावर चालतो. 
अलीकडे तंबूमध्ये राहण्याची सोय केली होती. हा व्यवसायही जोरात सुरू होता. मात्र, सध्या हा परिसर रेड झोनशेजारी असल्याने, पर्यटकांना येथे प्रवेश नाही. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नगर येथून दर वर्षी लोक येतात. त्यांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी खासगी वाहने उपलब्ध असतात. त्यामुळे खासगी वाहतूक करणाऱ्या तरुणांना मोठा रोजगार मिळतो. मात्र, या वर्षी पर्यटक नसल्याने तरुण बेरोजगार झाले आहेत. 

हेही वाचा त्यांना मिळतेय नाले बंद केल्याची शिक्षा 
 

पर्यटनस्थळी, तसेच धबधबे, धरण परिसरात पर्यटकांनी येऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. भंडारदरा परिसरात असलेल्या रिसॉर्टमध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना थांबू देऊ नये, अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. अभयारण्य परिसरात पर्यटकांना बंदी आहे. 
- दत्तात्रेय पडवळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, कळसूबाई अभयारण्य 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

Loksabha Election 2024 : या आहेत सहाव्या टप्प्यातील प्रमुख लढती

Drinking Water : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; मुख्यमंत्र्यांनी घेतला टंचाईचा आढावा

Sambit Patra : संबित पात्रांच्या विधानाचे पडसाद मतपेटीवर?

Kalyaninagar Accident : कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाच्या तपासासाठी दहा पथके नियुक्त

SCROLL FOR NEXT