Ban on animal husbandry in Ahmednagar city 
अहिल्यानगर

हे शहर जनावरांचे...म्हणून आयुक्तांना काढावा लागला हा आदेश

सकाळ वृत्तसेवा

नगर : शहरातील गोठेचालक, जनावराचे मालक यांना वारंवार सूचना देऊनही ते आपली जनावरे रस्त्यावर सोडून देत आहेत. त्यांनी जनावरांची व गोठ्यांची कोणत्याही प्रकारे नोंदणी केली नाही किंवा महापालिकेकडून परवाने घेतल्याचे दिसून येत नाही. 

नगर महापालिका हद्दीतील सर्व गोठेचालक, जनावरांचे मालक यांना आवाहन करण्यात आले आहे, की मोकाट फिरणाऱ्या गायी- म्हशी, बैल, वळू, शेळ्या- मेंढ्या आदी जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, अपघात होणे, नागरिकांना उपद्रव होणे, अशा घटना घडत आहेत. जणू काही हे शहर जनावरांचे झाले आहे, अशी टीका परगावच्या पाहुण्यांकडून ऐकायला मिळते.  शहरात रस्त्यावर गाडी कमी आणि शेळ्या, म्हैस, गाई दिसतात. बऱ्याचदा या जनावरांमुळे अपघात होतात. गाडीचालकाला ते हुंदाडून देतात. महागड्या गाड्यांचेही ते नुकसान करतात.

महापालिका हद्दीतील सर्व गोठेचालक, जनावरांचे मालक यांनी महापालिकेचा परवाना घेऊनच जनावरे पाळावीत, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आज दुग्धव्यावसायिकांना दिले.

या बाबत वारंवार सूचना देऊनही गोठेचालक व जनावरांचे मालक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांपासून मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे. या जनावरांपासून कोणताही अपघात झाल्यास त्यास महापालिका जबाबदार राहणार नाही. त्यामुळे सर्व गोठेचालक, जनावरांचे मालक यांनी महापालिकेचा परवाना घेऊनच जनावरे पाळावीत व जनावरे रस्त्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

तसे न केल्यास संबंधित गोठेचालक, जनावरांचे मालक यांच्यावर महाराष्ट्र नागरी क्षेत्रामध्ये गुरे पाळणे व त्यांची ने-आण करणे (नियंत्रण) महाराष्ट्र अधिनियम 1976, क्रमांक 45 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त मायकलवार यांनी स्पष्ट केले आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT