The bank will pay one per cent 
अहिल्यानगर

ही बँक जिल्हा परिषदेला देणार टक्केवारी 

दौलत झावरे

नगर : जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेतील सभासदांच्या कर्जाची वसुली जिल्हा परिषदेमार्फत होत आहे. त्यातून जिल्हा परिषदेला काही रक्कम मिळावी, अशी मागणी शिक्षण समितीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार कर्जाची वसुली बंद करण्यात आली होती. मात्र, आता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती व प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली अाहे. बॅंकेच्या निव्वळ नफ्यातील एक टक्का रक्कम जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी खर्च करण्याचा करार करण्यात येत आहे. हा करार अंतिम टप्प्यात आला आहे. 

जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणाऱ्या पगारातून प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या कर्जाची वसुली केली जात आहे. या वसुलीसाठी शिक्षक बॅंकेला कुठलाही खर्च येत नसून, त्यांची कर्जवसुली शंभर टक्के होत आहे. त्यामुळे बॅंकेकडून कर्जाच्या वसुलीपोटी जिल्हा परिषदेने रक्कम घ्यावी, अशी मागणी शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी केली होती.

त्यावर ही कर्जवसुली थांबविण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. त्यावरून बॅंक व सदस्य यांच्यात तिढा निर्माण झाला होता. यातून आता बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्ग काढला असून, बॅंकेला होणाऱ्या निव्वळ नफ्यातून एक टक्का रक्‍कम जिल्हा परिषदेमार्फत विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमावर खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे.

तसा करार आता बॅंकेकडून जिल्हा परिषदेशी करण्यात येणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून त्यांनी प्रशासनाला सादर केलेला आहे. त्यावर आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

शैक्षणिक उपक्रमासाठी खर्च करणार ः दुसुंगे

रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार, कुठलीही संस्था नफ्याच्या एक टक्का रक्कम धर्मादाय निधी म्हणून खर्च करू शकते. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बॅंकेने निव्वळ नफ्याच्या एक टक्का रक्‍कम जिल्हा परिषदेने सुचविलेल्या विद्यार्थी व शिक्षकांच्या उपक्रमासाठी खर्च करण्याची तयारी दाखविली आहे. 
- संतोष दुसंगे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बॅंक 

शिक्षण समित्याच्या सदस्यांशी चर्चा करणार ः शेळके

बॅंकेकडून निव्वळ नफ्यातून जिल्हा परिषदेतर्फे होणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमासाठी एक टक्का रक्कम देण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत शिक्षण समितीच्या सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. 
- प्रताप शेळके, उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सदस्य, जिल्हा परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT