Be careful! Increased tenure of the containment zone of these parts of the city 
अहिल्यानगर

सावधान! नगरमधील या भागांच्या कन्टेन्मेंट झोनची वाढली मुदत 

सकाळ वृत्तसेवा

नगर : शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. नगर जिल्ह्यात काल (मंगळवारी) एकाच दिवसात 49 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंता वाढत आहेत. नगर शहरातील कन्टेन्मेंट झोनमधील रुग्ण सापडण्याचे प्रमाण थांबलेले नाही. त्यामुळे ज्या भागातील कन्टेन्मेंट झोनची मुदत काल (मंगळवारी) मध्यरात्री संपत होती अशा कन्टेमेंट झोनची मुदत सात दिवसांनी वाढविण्याचा निर्णय महापालिकेचे आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांनी घेतला आहे. 

शहरातील सिद्धार्थनगर व तोफखाना भागातील कन्टेन्मेंट झोनची मुदत काल (मंगळवारी) संपत होती. मात्र काल रात्री सिद्धार्थनगर भागाजवळील गवळीवाडा येथे 12 कोरोना बाधित सापडून आले. त्यामुळे सिद्धार्थनगर व तोफखाना कन्टेन्मेंट झोनची मुदत सात दिवसांनी वाढविण्याचा निर्णय आज सकाळी घेण्यात आला. सिद्धार्थनगर व तोफखाना कन्टेमेंट झोनमध्ये अजूनही कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. दिल्ली गेट व नालेगाव कन्टेन्मेंट झोनचीही मुदत संपत आलेली आहे. त्यामुळे या भागातील कन्टेमेंट झोनचीही मुदत वाढते की काय याबाबत सध्या महापालिकेत चर्चा रंगली आहे. 

कोरोनाने वृद्धेचा मृत्यू 
शहरातील सावेडी उपनगरात आलेल्या नित्यसेवा सोसायटीमधील एका वृद्ध महिलेचा काल रात्री कोरोनाने मृत्यू झाल्याची बाब उघड झाली. त्यामुळे नित्यसेवा व निर्मलनगर भागात चिंतेचे वातावरण आहे. नित्यसेवा भागातील कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेच्या संपर्कातील 11 व्यक्‍तींचे स्वॅप घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

Navi Mumbai Municipal Schemes: प्रशिक्षणानंतर थेट नोकरी देण्याचा प्रयत्न, नवी मुंबई पालिकेचा विविध योजनांचा धमाका

Live Updates Marathi : अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक, तर धर्मेंद्र प्रधान ओम बिर्लांच्या भेटीला

ITR Deadline: सर्वांसाठी 31 जुलैची तारीख नाही! शेअर बाजारातील एक ट्रेड केला तरी बदलू शकते ITR डेडलाइन; पाहा नियम

माझ्याजवळ येऊन झोप...! नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT