On behalf of Sant Nirankari Mandal, a tree planting project has been implemented at Moryachichonre.jpg 
अहिल्यानगर

संत निरंकारी मंडळाच्या वतीने मोरयाचिचोंरे येथे वृक्षारोपण कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा

सोनई (अहमदनगर) : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन व भक्त मंडळ सोनई शाखेच्या वतीने बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या ६७ व्या जयंती निमित्ताने मोरयाचिचोंरे येथे ग्रामस्वच्छता व वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

सदगुरुमाता सुदीक्षा महाराज यांच्या आदेशानुसार संत निरंकारी मंडळाचे सोनई शाखा प्रमुख विठ्ठल खाडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 'वृक्षारोपण आणि वृक्ष संरक्षण' अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सोनई, माका, देडगाव आणि परिसरातील निरंकारी सेवादार बंधू-भगिनी तसेच भक्तगण उपस्थित होते.

यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने मोरयाचिचोंरे गाव दत्तक घेण्यात आले असून येथे वर्षभर वृक्षारोपण उपक्रम करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. निरंकारी भक्तमंडळाने सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ५० झाडांचे वृक्षारोपण व लावलेल्या रोपांना मल्चिंग करण्यात आले. झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारी घेत असल्याचे खाडे महाराज यांनी सांगितले. या अगळ्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

SCROLL FOR NEXT