श्रीगोंदे : कोरोनाच्या संकटात झालेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका श्रीगोंदे एसटी आगाराला बसला आहे. आगाराला रोज सहा लाखांचे उत्पन्न मिळत होते. त्यासाठी रोज 20 हजार प्रवाशी एसटीने प्रवास करीत असत. मात्र, मागील दोन महिने एसटी बंद राहिली. परिणामी, बस आगाराला सुमारे तीन कोटी 60 लाखांचा तोटा झाला आहे. सध्या एसटी सुरू असली, तरी केवळ सरासरी 100 प्रवाशीच एसटीत बसत आहेत. त्यामुळे आजही ही लालपरी तोट्यातच आहे.
हेही वाचा : संगमनेरच्या तहसीलदारांविरुद्ध गुन्हा...
श्रीगोंदे तालुक्यासह आसपासच्या दौंड, पुणे, नगरसह मुंबई, कोल्हापूर, नाशिक, सांगली, पंढरपूर आदी भागात फिरणाऱ्या श्रीगोंदे एसटी आगाराच्या लालपरीची चाके दोन महिने स्थिरावली होती.
लॉकडाउनपूर्वी अशी होती स्थिती
कोरोना संकट आणि त्यामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे आगारातच एसटी थांबली होती. मात्र, त्यामुळे आगाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले. श्रीगोंदे आगारात एकूण 69 बस आहेत. साधारण दिवशी या बसच्या 520 फेऱ्या होतात. त्या फेऱ्यांच्या माध्यमातून एसटीचा 21 हजार 189 किलोमीटरचा प्रवास होत होता. सरासरी रोज 20 हजार प्रवाशी एसटीने प्रवास करीत. त्यातून एसटीला रोज सहा लाखांच्या घरात उत्पन्न मिळत होते. त्यासाठी महिन्याला साधारण 80 लाखांचा इंधनखर्च येत होता.
पगारावर सव्वा कोटी खर्च
सध्या दोन एसटीच्या 8 फेऱ्या होतात व त्यांचे दैनंदिन 400 किलोमीटर होतात. रोजचे सरासरी उत्पन्न 5 हजारांच्या घरात असून, केवळ 100 प्रवाशीच एसटीने प्रवास करीत आहेत. दोन महिने एसटी बंद राहिल्याने तीन कोटी 60 लाखांचा तोटा झाला. अर्थात त्यात 1 कोटी 60 लाखांचे इंधन वाचले असले, तरी एसटीचे उत्पन्न बंद असतानाच एकूण 367 कर्मचाऱ्यांना दोन महिन्यंत सव्वा कोटींवर पगार द्यावा लागला. हा एका अर्थी भुर्दंडच आहे. त्यामुळे श्रीगोंदे आगाराला मोठा फटका सहन करावा लागला, हे सत्य आहे.
बसची गरज असल्यास संपर्क करा
लोकांच्या सेवेसाठी एसटी सुरू केली आहे. ज्यांना कुणाला अत्यावश्यक सेवेसाठी बसची गरज आहे, त्यांनी आगाराशी संपर्क करावा, जेणेकरुन फेऱ्यांचे नियोजन करता येईल.
- प्रवीण शिंदे, आगारप्रमुख, श्रीगोंदे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.