Birthday of Sayaji Shinde's tree present at More Chinchore 
अहिल्यानगर

मोरे चिंचोरेत झाडांचा वाढदिवस...प्रशांत गडाख पाटलांच्या वृक्षप्रेमाचा सयाजी शिंदेंना वाटतो अभिमान

सकाळ वृत्तसेवा

नगर ः यशवंत सामाजिक प्रतिष्ठानातर्फे युवा नेते प्रशांत पाटील गडाख यांनी मोरया चिंचोरे (ता. नेवासे) हे गाव दत्तक घेतले आहे. येथे आता वर्षभर वृक्षलागवड केली जाणार आहे. 
मोरया चिंचोरे येथे यशवंत प्रतिष्ठानामार्फत वृक्षारोपण चळवळ, यशवंत वाचनालय, तंटामुक्त गाव, आदी संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. गावात हजारो देशी झाडांचे रोपण केल्याने हा परिसर वनराईने नटला आहे.

गतवर्षी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते पाच हजार झाडे लावण्यास सुरवात झाली होती. त्यावेळी शिंदे यांनी झाडांचे संगोपन केलेले पाहण्यासाठी व गावाला भेट देण्यासाठी परत येईल, असा शब्द दिला होता. तो त्यांनी काल (शुक्रवारी) खरा करून दाखविला.

शिंदे यांनी लावलेल्या झाडाचा वाढदिवस विठ्ठलनामाच्या गजरात साजरा झाला. वर्षभर झाडाचे संगोपन करणाऱ्या साक्षी दराडे हिचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. सोनई परिसरातील ज्या कुणाचा वाढदिवस असेल, त्याने मोरया चिंचोरे येथे वाढदिवशी वृक्षारोपण करावे व मोरया चिंचोरे अधिक सदाहरित करण्याचा संकल्प सोडण्यात आला. 
गडाख म्हणाले, ""झाडांवर प्रेम करणारे, वृक्षारोपण करणारे, झाड व माणूस यांच्यातील आपलेपण समजून सांगणारे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे गेल्या 40 वर्षांपासून काम करीत आहेत. आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही ती परंपरा पुढे नेत आहोत. वृक्षचळवळ बळकट करीत आहोत. सयाजी शिंदे यांनी वर्षभर मोरया चिंचोरे गावात वृक्षरोपण करण्याचा संकल्प दिला. तो आम्ही सिद्धीस नेणार आहोत.'' सयाजी शिंदे स्वरचित वृक्षगीत सर्वांना ऐकविण्यात आले. अहमदनगर


प्रशांत पाटील गडाख अध्यक्ष असलेल्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाच्या माध्यमातून वर्षातील 365 दिवस झाडे लावणारे गाव, म्हणून मोरया चिंचोरेची राज्याला पथदर्शी अशी ओळख होईल. तरुणाईसह झाडांचेही वाढदिवस साजरे करणारे मोरया चिंचोरे आगळेवेगळे गाव आहे. गडाख व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानाने येथे आदर्शवत काम केले. 
- सयाजी शिंदे, अभिनेते 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: भारताने नागपूरचं मैदान मारलं! न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या T20I सामन्यात दणदणीत विजय, ग्लेन फिलिप्सची फिफ्टी व्यर्थ

Bus-Tanker accident : राष्ट्रीय महामार्गावर बस अन् टँकरचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, २० जखमी

IND vs NZ, 1st T20I: १४ षटकार अन् २१ चौकार... भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध उभारली विक्रमी धावसंख्या! जाणून घ्या कोणते विक्रम रचले

Baramati Elections : बारामतीत उमेदवार यादी जाहीर; जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय गणिते बदलली

Sudhagad News : सुधागडात राजकीय भूकंप! शिंदे गटाचे देशमुख बंधू भाजपात दाखल

SCROLL FOR NEXT