आमदार नीलेश लंके ई सकाळ
अहिल्यानगर

भाजपतही राष्ट्रवादीच्या आमदाराचा बोलबाला

सकाळ डिजिटल टीम

जात, धर्म विचारधारा असा दुजाभाव न करता मतदारसंघाबाहेरीलही रूग्णांचीही आमदार लंके हे अहोरात्र सेवा करून रुग्णांना उपचारांबरोबरच मानसिक आधार देऊन त्यांची काळजी घेण्याचे काम करीत आहेत.

भाळवणी : विधानसभेतील सहकारी आमदार नीलेश लंके हे कोरोना संकटाच्या काळात रुग्णांची करीत असलेली सेवा ही कौतुक व अभिमानास्पद आहे. त्यांचा आदर्श घेऊन राज्यात कोव्हिड सेंटर सुरू करावेत, असे सांगत आमदार लंके यांच्या कार्याचे चिखलीच्या भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी कौतुक केले. (BJP MLAs appreciate Nilesh Lankes work)

भाळवणी येथे सुरू असलेल्या शरदचंद्र पवार कोव्हिड सेंटरला आमदार महाले यांनी भेट देऊन पाहणी केली. येथील रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. आमदार महाले म्हणाल्या की, विधानसभेतील सहकारी नीलेश लंके हे कोरोना रुग्णांसाठी करीत असलेले कार्य आपण ऐकून होतो. सर्वच सोशल मीडियावर आमदार लंके हे एकच नाव झळकत आहे.

प्रत्यक्ष या कोव्हिड सेंटरला भेट देण्याचा योग आला.येथील कोव्हिड सेंटर हेच आपले घर व कुटुंब असल्याचे मानून कोणत्याही जात, धर्म विचारधारा असा दुजाभाव न करता मतदारसंघाबाहेरीलही रूग्णांचीही आमदार लंके हे अहोरात्र सेवा करून रुग्णांना उपचारांबरोबरच मानसिक आधार देऊन त्यांची काळजी घेण्याचे काम करीत आहेत.

कोरोना रुग्णांना मानसिक आधार देऊन त्यांची आपुलकीने विचारपूस केल्यास तो रुग्ण कोरोनावर मात करू शकतो. आणि हीच बाब ओळखून आमदार लंके हे रुग्णांना उपचाराबरोबरच मानसिक आधार देण्याचे काम करीत आहेत ही कौतुकास्पद बाब आहे. आमदार लंके यांचा आदर्श घेऊन राज्यातही कोव्हिड सेंटर सुरू करावेत असे महाले म्हणाल्या.

यावेळी आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे सचिव ॲड. राहुल झावरे. राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, बाळासाहेब खिलारी,अभयसिंह नांगरे,अनिल गंधाक्ते,प्रमोद गोडसे,सूरज भुजबळ आदी. यावेळी उपस्थित होते.
(BJP MLAs appreciate Nilesh Lankes work)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Jagatap Resignation : शरद पवारांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीआधी पुण्यात मोठा धक्का; प्रशांत जगताप यांनी सोडलं शहाराध्यक्ष पद!

''तेव्हाच बदला घ्यायला पाहिजे होता'', अ‍ॅसिड हल्ल्यातील आरोपीची सोळा वर्षांनंतर निर्दोष मुक्तता; पीडितेचा टाहो

Dhule Municipal Election : कोणाला 'हो' म्हणावे अन् कोणाला 'नाही'? इच्छुकांच्या गर्दीने भाजपचे नेते 'स्ट्रेस'मध्ये

Media Freedom Under Threat in Bangladesh: बांगालदेशात आता माध्यम स्वातंत्र्यही धोक्यात!, कट्टरपंथींनी टेलिव्हिजन अँकरला दिली जीवे मारण्याची धमकी

Kasara Ghat Accident : कसारा घाटात अपघातांचे सत्र! सलग दोन अपघातांमुळे मुंबई-नाशिक महामार्ग तासाभर ठप्प

SCROLL FOR NEXT