bjp shivajirao kardile son shinde group city district president dilip satpute clash in kedgaon ahmednagar news  
अहिल्यानगर

शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेक; भाजप नेत्याच्या मुलासह ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा

सकाळ डिजिटल टीम

अहमदनगर : शिवसेनेत बंड झालं आणि एकनाथ शिंदे यांनी आमदारांना सोबत घेत भाजपशी युती केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे - भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. दरम्यान या सत्तांतरानंतर या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊ शिंदे गटातील नेत्याच्या हॉटेलवर दगडफेकीची घटान समोर आली आहे.

अहमदनगरमधील केडगाव परिसरात भाजपचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पुत्र आणि शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सातपुते यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेली की, कर्डिले यांच्या मुलाने शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं झालं काय?

एका लग्न समारंभात माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा मुलगा अक्षय कर्डिले याचा सातपुते यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात कर्डिले यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना घेऊन सातपुते यांच्या मालकीच्या रंगोली हॉटेवर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत हॉटेलसह परिसरातील काही वाहनांचे देखील नुकसान झाले.

याप्रकरणी दिलीप सातपुते यांचे बंधू विठ्ठल सातपुते यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. तक्रार दाखल होताच, पोलिसांनी कर्डिले यांच्या मुलासह 50 ते 60 जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Nagpur EVM Training: आगामी निवडणुकीत ‘एस-३’ मतदान यंत्राचा वापर;नागपूर जिल्ह्याला तीन हजार कंट्रोल युनिट प्राप्त; कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

पत्नीशी वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ३२ वर्षीय मुलाने वडिलांना झोपेतच संपवलं; डोंबिवली हादरली

SCROLL FOR NEXT