BJP's Mission Ahmednagar: Fadnavis has come up with a master plan for Nagar District Bank 
अहिल्यानगर

देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीबाबत कोणता आखलाय मास्टर प्लॅन?

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय झाला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाले. 

मुंबईतील फडणवीस यांच्या बंगल्यात काल (मंगळवारी) रात्री बैठक झाली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे व शिवाजी कर्डिले, माजी आमदार वैभव पिचड व बाळासाहेब मुरकुटे, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, विठ्ठल लंघे, सुजित झावरे, प्रा. भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे आदी उपस्थित होते.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी भाजपने पूर्वीच तयारी सुरू केली होती. खासदार डॉ. विखे पाटील यांनी स्वतंत्र पॅनलचे संकेतही दिले होते. 20 फेब्रुवारी रोजी बॅंकेच्या 21 जागांसाठी मतदान होत आहे. त्यात सेवा संस्थांमधून 14, मागास प्रवर्गातून 1, महिला राखीवमधून 2, अनुसूचित जमाती 1, भटके विमुक्त 1, शेतीपूरक संस्था 1 व बिगरशेती संस्थांमधून 1, अशा प्रकारे संचालकांची निवड होणार आहे. 

नगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. मातब्बर नेते भाजपमध्येच आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणूक स्वतंत्र लढल्यास बॅंकेवर भाजपचीच सत्ता येईल, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर फडणवीस यांनी स्वतंत्र लढण्यास "ग्रीन सिग्नल' दिला. याबाबतचे सर्व अधिकार फडणवीस यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. 

भाजपमध्ये मातब्बर नेते आहेत. त्यामुळे जिल्हा बॅंकेवर भाजपची सत्ता आणणे सोपे होणार आहे. त्यामुळे भाजप स्वतंत्र पॅनल करणार असून, बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा देता येणार आहेत. 
- प्रा. भानुदास बेरड, कार्यकारिणी सदस्य, भाजप 


बॅंकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र पॅनलचा आग्रह सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी धरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बॅंकेवर भाजपचाच झेंडा फडकताना दिसेल. 
- अरुण मुंडे, जिल्हाध्यक्ष, भाजप 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained : इटलीत बंद पाडलेली विषारी 'यंत्रणा' रत्नागिरीत... कोकणचं भविष्य धोक्यात?, PFAS काय आहे? Italy मध्ये काय घडलं होतं?

Mumbai Crime: वर्दीला कलंक ! मुंबईत गजबजलेल्या उद्यानात पोलिस अधिकाऱ्याचे गतीमंद महिलेसोबत अश्लील कृत्य, नागरिकांनी बेदम चोप दिला अन्...

Pune Scam : पुणेकरांनो अलर्ट! मोबाईलवर RTO कडून आलाय ई-चलनचा मेसेज? आता बँक अकाऊंट होईल रिकामं..नेमका फ्रॉड काय पाहा

Satara News: अभिजीत बिचुकलेंचा नवा विक्रम! जुन्या मतांच्या रेकॉर्डला टाकले मागे, अपक्ष उमेदवारांच्या यादीत मिळवले दुसरे स्थान..

न्याय राहुदे पण अन्याय तरी करू नका, आंदेकरांना तिकीट दिलंत तर..., बंडू आंदेकरांच्या लेकीचा सर्वपक्षीयांना इशारा

SCROLL FOR NEXT