BJP's Vaibhav Pichad withdraws from district bank elections 
अहिल्यानगर

भाजपचे वैभव पिचड यांची जिल्हा बँक निवडणुकीतून अनाकलनीय माघार

शांताराम काळे

अकोले : जिल्हा सहकारी बँकेत अनुसूचित जाती जमाती व प्रक्रिया उद्योग मतदारसंघातून माजी आमदार वैभव पिचड यांनी माघार घेतली आहे.

विखे थोरात गटात अजूनही खलबते चालू आहेत. या दोन्ही जागांवर अद्यापि दोन वाजेपर्यंत निर्णय झालेला नव्हता. एका जागेसाठी सात उमेदवार रिंगणात होते .त्यात माजी आमदार वैभव पिचड, डॉ. चेतन सदशिव लोखंडे, नंदकुमार डोळस, निवास त्रिभुवन, अशोक भांगरे, अमित भांगरे, दीपक गायकवाड यांचा समावेश आहे.

या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले होते. त्यांनी सीताराम गायकर यांना मोकळीक देत वैभव पिचड यांच्यासाठी पेच निर्माण केला होता.

काल अकोले येथील पत्रकार परिषदेत दशरथ सावंत, सुरेश गडाख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीला मन देऊन माघार घेतली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांचा बिनविरोध मार्ग मोकळा झाला. त्यामुळे रात्री गणिते बदलली व आज माजी आमदार वैभव पिचड यांनी आपली माघार घेत इतरांना मार्ग मोकळा करून दिला आहे.

निवडणूक झाली असती तरी गायकर  यांचा विजय निश्चित होता. मात्र, येणाऱ्या अगस्ती निवडणुकीत सोपे राजकारण होण्यासाठी माघारीचा फार्स करण्यात आल्याची तालुक्यात चर्चा आहे.

अशोक भांगरे किंवा अमित भांगरे यांना उमेदवारी देणार की, शिवसेनेचे खासदार लोखंडे यांचे पुत्र डॉ. चेतन लोखंडे यांना उमेदवारी मिळणार. त्यात विखे काय भूमिका घेतात यावर सर्वच गोष्टी अवलंबून असल्याचे दिसते.

मंत्री थोरात व माजी मंत्री विखे यांच्या दोन ठिकाणी बैठका सुरू आहेत. उमेदवार निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, अकोले तालुक्यात एकमेव उमेदवार सीताराम गायकर यांची जिल्हा बँकेवर वर्णी लागली आहे. पिचड यांच्या माघारीबाबत त्यांनी का निर्णय घेतला हे समजू शकले नाही. मात्र, तालुक्यात नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेच्या समित्यांच्या बैठकीत चहापानावर लाखोंचा खर्च; निविदेविना बिले मंजूर होत असल्याचे उघड

Pune News: ईडब्ल्यूएस संशोधक विद्यार्थ्यांची अधिछात्रवृत्तीची प्रतीक्षा; ‘अमृत’कडून लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार

Latest Marathi News Update : नागपुरातील इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचं नाव

मोहसिन नक्वींच्या हातून नाकारलेले Asia Cup मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर येणारच, पण...; BCCI सचिवांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT