Both Congress flags on Shrigonde Bazar Samiti
Both Congress flags on Shrigonde Bazar Samiti 
अहमदनगर

राहुल जगतापांच्या खेळीने श्रीगोंदे बाजार समितीतून भाजप आउट

संजय आ. काटे

श्रीगोंदे : राजकीय पोक्तपणा दाखवित माजी आमदार राहुल जगताप यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता काबीज केली. बाजार समितीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकला. संजय जामदार यांची सभापतिपदी, तर संजय महांडुळे यांची उपसभापतिपदी निवड झाली. त्यांनी आमदार पाचपुते गटाचे लक्ष्मण नलगे व वैभव पाचपुते यांचा पराभव केला. 

बाजार समितीच्या राजकीय चर्चेला आज या निवडींनी पूर्णविराम मिळाला. समितीच्या गोदामात सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सभापतिपदासाठी अर्ज दाखल करतानाच, जगताप गटात फूट पडली होती.

जामदार व नलगे यांचे सभापतिपदासाठी, तर उपसभापतिपदासाठी महांडुळे व पाचपुते यांचे अर्ज दाखल झाले. जगताप गटाच्या मीना आढाव यांनी दोन्ही ठिकाणी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली. 

आढाव यांच्यासोबत काही मते गेल्यास, त्याचा सरळ फायदा पाचपुते गटाला होणार होता. मात्र, याही स्थितीत जगताप यांनी त्यांच्याकडील राजकीय अस्त्रे वापरुन आढाव यांना मानणारी मते जामदार यांच्या पारड्यात पाडण्यात यश मिळविले. जामदार यांना 10, नलगे यांना 7, तर आढाव यांना 1 मत मिळाले. उपसभापती निवडीत महांडुळे यांना 10, तर पाचपुते यांना 8 मते मिळाली.

पाचपुते गटाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, जगताप यांचा राजकीय पोक्तपणा या निवडीत दिसून आला. काही महिन्यांपूर्वी पंचायत समितीची सत्ता पाचपुते यांच्याकडून काढून घेताना, तेथे काँग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविला होता. त्याचीच पुनरावृत्ती आज समितीत झाली. 

जगताप यांनी विधानसभा निवडणूक लढविली नव्हती. त्यामुळे त्यांच्या आगामी राजकारणाविषयी वेगळी चर्चा पुढे येत होती. मात्र, पंचायत समितीपाठोपाठ बाजार समितीची सत्ता काबीज करून, श्रीगोंद्याच्या राजकारणात ते आजही मजबूत स्थितीत असल्याचे दाखवून दिले. निवडीनंतर जगताप यांच्यासह ज्येष्ठ नेते घनश्‍याम शेलार, बाबासाहेब भोस, अण्णा शेलार, मनोहर पोटे, दीपक भोसले यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. 

नाहाटा-भोसले यांची रणनीती 
पाचपुते गटाकडून डावपेच टाकले जात असताना, जगताप गटाची फिल्डींग मजबूत करण्याचे काम समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांनी केले. या दोघांनी त्यांचे संचालक जागीच ठेवून विरोधकांचा एक संचालक फोडत, जामदार व महांडुळे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

माजी आमदार राहुल जगताप यांनी या निवडीत सूत्रे हातात घेत, तालुक्‍याच्या राजकारणात काम करण्याची संधी दिली. तालुक्‍यातील यापुढचे राजकारण जगताप यांच्यासोबतच करणार आहे. 
- संजय जामदार, सभापती, बाजार समिती, श्रीगोंदे 

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT