Breaking into a grocery store and stealing dried fruit
Breaking into a grocery store and stealing dried fruit 
अहमदनगर

किराणा दुकान फोडले पण सुक्यावरच मारला ताव, नोटांचे बंडल तसेच

मार्तंड बुचुडे

पारनेर ः किराणा दुकानात चोरी झाली तर शक्यतो पैशांवर डल्ला मारतात. परंतु पारनेर तालुक्यातील सुपे येथे भलतेच घडलं. चोरटे भुकेले होते. त्यांनी फक्त शेलक्या वस्तूंवरच ताव मारला. 
सुपे येथील साई श्रद्धा किराणा मालाच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुका मेवा फस्त केला. यात चोट्यांनी सुमारे 13 किलो बदाम, 10 किलो काजू व रोख रक्कम 53 हजार असा ऐवज लांबविला. ही घटना रात्री दोन वाजणेच्या सुमारास घडली. 
या बाबत किराणा दुकाणाचे मालक संदीप जगन्नाथ भुजबळ(रा. सुपे) यांनी सुपे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

या बाबत माहीती अशी की, काल रात्री (ता. 24 ) दोन वाजणेच्या सुमारास सुपे येथील बँक कॉलीनीत असलेले भुजबळ यांच्या साई श्रद्धा या दुकानाचे रात्री दोन वाजणेच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यांनी फक्त 13 किलो बदाम सुमारे 10 हजार रूपयांचे, 10 किलो काजू सुमारे सात हजार चारशे रूपयांचे व दोन हजार, पाचशे, दोनशे, व शंभर रूपयांच्या नोटा असे गल्यात ठेवलेले रोख 53 हजार रूपये असे एकूण सुमारे 70 हजार चारशे रूपयांचा ऐवज लांबविले. 

या बाबत भुजबळ यांनी सुपे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार एस.एन कुटे व आर.जे.साबळे करत आहेत. 

दहा रूपयांचे बंडलही नेले नाही 
चोरट्यांनाही फक्त सुका मेवाच आवडला. त्यांनी बदाम, काजू व रोख रकमेचीच फक्त चोरी केली. किराणा दुकानात इतर किराणा माल मोठ्या प्रमाणात असूनदेखील त्यांनी फक्त सुका मेवा व रोख रकमेवरच डल्ला मारला. इतकेच नव्हे तर छोट्या दहा रूपयांच्या नोटा व सुटे पैसे तसेच आहे. गूळ खोबरे किंवा इतर किराणा मालाकडे मात्र कानाडोळा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सांगोल्यात संतप्त मतदाराने EVM मशिन पेटवली

IPL 2024 : पावसामुळे बिघडणार प्लेऑफची शर्यत! SRH विरुद्ध LSG सामन्यापूर्वी हवामानाचे मोठे अपडेट

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सोलापूर-पेणमधील मतदारांचा मतदानावर बहिष्कार; पश्चिम बंगालमध्येही आंदोलन

Crime: 'विषारी गोमांस देऊन सासरच्यांना संपवले!' 8 हत्या करून महिलेने भर कोर्टात नाकारले आरोप; वाचा संपूर्ण प्रकरण

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT