A bribe of Rs 7 crore to Sonaikar by showing the lure of double the amount in a year 
अहिल्यानगर

वर्षात दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून सोनईकरांना सात कोटींचा गंडा

विनायक दरंदले

सोनई (जि.अहमदनगर) ः एका वर्षात दामदुप्पट व सोबत आकर्षक विमान प्रवासाचे अमिष दाखवून सोनई परीसरात सहा कोटी ८१ लाख रुपायांचा गंडा घातल्या प्रकरणी सहा जणांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनई येथील आण्णासाहेब मिठ्ठू दरंदले यांनी सोनई पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून विष्णु रामचंद्र भागवत रा.दवंडगाव (जि.नाशिक), नीलेश जनार्दन कुंभार रा.मंचर (जि.पुणे), सुरेश सीताराम घंगाडे (रा. तळेगाव जि.पुणे), राजेंद्र वामन देशमुख, प्रवीण गंगाधर कवडे (रा.कोतुळ, जि.नगर), शांताराम अशोक देवतरसे (रा.सोनई) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उज्वलम अॅग्रो मल्टीस्टेट, माऊली मल्टीस्टेट सोसायटी, संकल्पसिध्दी इंडिया प्रा. लि., प्राॅफिट टिचर फ्लाय हाॅलिडे या संस्थेचे नाव सांगून एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे अमिष दाखविण्यात आले.

सहभागी व्यक्तीला जमिन व विमान प्रवासाचे अश्वासन देण्यात आले.सन २०१७ ते २०१९ दरम्यान सोनई, मुळा कारखाना, श्रीरामवाडी व परीसरातून पैसे नेले. मुदत संपुनही दामदुप्पट रक्कम मिळाली नाही, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपींनी सोनई, शिर्डी, आळेफाटा येथील हाॅटेल 
व लाॅजवर बैठका घेवून दुप्पट पैशाचे अमिष  दाखविले
होते. अनेकांनी जमिनी विकून व घरातील सोने मोडून
पैसे गुंतवले  होते. सोनईतील अनेक जण त्यावेळी  पटवापटवी करण्यासाठी कार्यरत होते. दीड वर्ष उलटूनही पैसे मिळत  नसल्याने  फिर्याद  देण्यात  आली आहे. अधिक तपास सहायक  पोलिस निरीक्षक  रामचंद्र कर्पे करत आहेत. 
      

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचे ‘म्युल अकाउंट’ रडारवर; पुणे पोलिसांची मोठी मोहीम; आठ दिवसांत १०० हून अधिक गुन्हे दाखल

Madhuri Elephant Return To Nandani Math : 'माधुरी हत्तीणी'च्या मुद्द्यावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता! 13 सप्टेंबरची 'डेडलाईन'; राजू शेट्टींचा सरकारला थेट इशारा

Live Marathi News Update : २९ ऑगस्टला निर्णायक आंदोलनाचा इशारा; मनोज जरांगे यांची मोठी घोषणा

Mallikarjun Kharge Warrant : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंच्या अडचणीत वाढ ! कोर्टाने जारी केले वॉरंट; नेमकं काय आहे प्रकरण?

पीएचडी स्कॉलर ज्योतीचा विद्यापीठ कॅम्प्समध्ये शॉक लागून मृत्यू; कुटुंबाला १६ लाखांची नुकसान भरपाई आणि भावाला नोकरीची घोषणा

SCROLL FOR NEXT