The Bribery Department has caught a private employee of the Kokangaon Ghumri Talathi office taking bribe 
अहिल्यानगर

पंचांसमोरच मागितली लाच; तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा

कर्जत (अहमदनगर) : तालुक्‍यातील कोकणगाव घुमरी तलाठी कार्यालयातील खासगी कर्मचारी सचिन सुरेश क्षीरसागर (वय 35) रा. मिरजगाव याला एक हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

महापालिकेचे 685 कोटीचे अंदाजपत्रक 'स्थायी' समोर सादर
 
या बाबत वृत्त असे की, तक्रारदार यांनी त्यांचे घुमरी गावातील वडिलोपार्जित शेतीचे वाटणी पत्र करुन त्या आधारे फेरफार नोंद करून उतारा मिळणेकरिता तलाठी घुमरी, सजा कोकणगाव यांच्याकडे अर्ज दिला होता. त्याआधारे तलाठी यांच्याकडून फेरफार नोंद केली. उतारा मिळवून देण्यासाठी तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणारे सचीन क्षीरसागर यांनी एक हजार रुपयांची मागणी केली. या बाबत तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक, नगर विभागाकडे रितसर तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून (ता. 15) रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये आरोपी क्षीरसागर याने पंचा समक्ष हजार रुपये लाचेची मागणी केली. 

त्यानुसार गुरुवार (ता. 18) रोजी सदरची रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचा समक्ष, जगदंब ईलेक्‍ट्रिकल समोर, नगर सोलापूर मार्गावर, मिरजगाव येथे स्विकारली असता क्षीरसागर यास रंगेहाथ पकडले आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे, वाचक पोलिस उपअधीक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक शाम पवरे, पोलिस नाईक रमेश चौधरी, विजय गंगुल, पोलिस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, महिला पोलिस अंमलदार राधा खेमनर, संध्या म्हस्के, चालक पोलिस हवालदार हरुन शेख यांनी कामगिरी बजावली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT