Bring the body to Ahmednagar 
अहिल्यानगर

अंत्यविधी सुरू असतानाच डॉक्टरांचा फोन...नातेवाईकांची पाचावर धारण

सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर ः शहरातील प्रभाग दोनमधील 60 वर्षीय रुग्णाचा रात्री नगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर संबंधित रुग्णाचा आज सकाळी शासकीय नियमानुसार येथे दफनिवधी करण्यात येत होता. तेव्हा नगरवरून फोन गेला...संबंधित व्यक्तीचा मृतदेह नगरला पाठवा. सगळेच धास्तावले.

बुधवारी (ता.3) संबंधित रुग्णाला त्रास होवू लागल्याने खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. न्युमोनियाचे लक्षणे आढळल्याने त्याला नगरला नेण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिल्यानंतर त्याला सिव्हीलला हलविण्यात आले. तेथे त्यांच्या घशातील स्राव घेवून तपासणीसाठी पाठविले होते.

आज पहाटे नगर येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ह्रदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. स्थानिक प्रशासनाला याची कुठलीही माहिती नव्हती. रात्री संबंधित रुग्णाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याचे समोर आले.

संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर पाटील यांच्या सुचनेनुसार पोलिस निरिक्षक श्रीहरी बहिरट व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोहन शिंदे यांनी पोलिस फौजफाट्यासह जावून मृतदेह ताब्यात घेत नातेवाईकांच्या उपस्थितीत शासकिय नियमानुसार दफनविधी सुरु केला होता.

त्यावेळी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने मृतदेह नगरला पाठवावा, संबंधित रुग्णाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्या्च्यावर अंत्यसंस्कार करु नयेत, अशी सूचना त्यांनी केली. तोपर्यंत दफनविधी करण्यात आला होता.

मी रूग्णाच्या वार्डाची प्रमुख आहे

मी वार्डाची प्रमुख अाहे. सकाळी मृतदेह ताब्यात देणाऱ्या कर्मचाऱ्याला रुग्ण कोरोनाबाधित असल्याची कल्पना नव्हती. नोडल अधिकारी डाॅ. बापुसाहेब गाढे यांनी रुग्णाचा मृतदेह नगरला पाठविण्याचे मला सांगितले असल्याचे महिला कर्मचाऱ्याने कुटुंबियांना सांगितले.

डॉक्टर म्हणतात...

जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता, कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह सॅनिटाईज करून दुहेरी प्लॅस्टिकमध्ये बंदिस्त केला जातो. नातेवाईकांनी मागणी केल्यास त्यांच्या ताब्यात मृतदेह दिला जातो. मात्र, त्यांनी तो नगरपालिकेच्या ताब्यात देणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर पालिकेने नातावाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करणे गरजेचे आहे.

तर नातेवाईकांवर कारवाई

नातेवाईकांनी संबंधित व्यक्तीचा मृतदेह थेट घरी नेला. त्यांना मृतदेह घरी नेण्याचा अधिकार नव्हता. मृतदेहाच्या प्लॅस्टिकची खोलखाल केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT