C status of Lakshmi Mata temple in Kopargaon as a pilgrimage site
C status of Lakshmi Mata temple in Kopargaon as a pilgrimage site 
अहमदनगर

कोपरगावच्या लक्ष्मीमाता मंदिरास तीर्थक्षेत्रात क दर्जा

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव ः तालुक्यातील कोकमठाण पंचक्रोशीचे श्रद्धास्थान असलेल्या लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला. त्यामुळे या मंदिराकडे येणारे रस्ते तसेच परिसराचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली. 

ते म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपण केलेल्या मागणीवरून हा दर्जा देण्यात आला.

कोपरगाव विधानसभा संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी द्यावा. रांजणगाव देशमुख उपसा जलसिंचन योजनेसाठी सौरऊर्जा यंत्रणा बसवावी. या दोन महत्वाच्या मागण्यांना पालकमंत्री मुश्रीफ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सलग दोन वर्ष मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे.

तालुक्याच्या दुष्काळी गावातील रांजणगाव देशमुखसह, अंजनापूर, बहादराबाद, धोंडेवाडी, सोयेगाव, वेस, मनेगाव अशा सात गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे.

या ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे वीजबिल थकबाकी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वारंवार उद्भवणाऱ्या वीज बिलाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी विद्युत पंपाऐवजी येथे सौरऊर्जा प्रकल्प बसवावा. या मागण्या आपण केल्या. त्यापैकी लक्ष्मीमाता मंदिर देवस्थानास तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा त्वरीत मंजूर करण्यात आला आहे.

उर्वरीत दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे अश्वासन पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले. या बैठकीस ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सुजय विखे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनीधी उपस्थीत होते. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Heat Wave : विदर्भात आजपासून उष्णतेची लाट, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

SCROLL FOR NEXT