A case was finally registered against a private lender in Parner 
अहिल्यानगर

12 हजार कर्जाचे 95 हजार रुपये घेणाऱ्या "त्या' सावकारावर अखेर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : जवळे येथील खासगी सावकाराकडून घेतलेल्या 12 हजार रुपयांच्या कर्जापोटी वेळोवेळी व्याजासह 95 हजार रुपयांची परतफेड केली. मात्र, त्यानंतरही सावकाराच्या पत्नीने एक मे रोजी थेट गरजू महिलेच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी सोशल मीडियातून समोर आले होते. 

पोलिस ठाणे व सहकार खात्याकडे तक्रारीसाठी हेलपाटे मारूनही त्याची दखल न घेतल्याने ही महिला हतबल झाली होती. अखेर सहकार खात्याला तक्रारीची दखल घ्यावी लागली. सहकार अधिकारी तात्यासाहेब शहाजी भोसले यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस ठाण्यात काल (ता.9) त्या खासगी सावकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकाश ऊर्फ पिंटू हरिभाऊ कोठावळे (रा. जवळे, ता. पारनेर) असे त्याचे नाव आहे. 

घटनेची पार्श्‍वभूमी 

जवळे येथील सुनंदा दरेकर यांनी 4 ऑक्‍टोबर 2019 रोजी गावातील खासगी सावकार प्रकाश कोठावळे याच्याकडून 12 हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जापोटी दरेकर यांनी वेळोवेळी सुमारे 95 हजार रुपये सावकाराला परत केले. मात्र, त्यानंतरही साडेसात हजार रुपये बाकी असल्याचे सावकाराने सांगितले. हे पैसे 24 एप्रिल रोजी देण्याचे ठरले होते. मात्र, दरेकर यांना ही रक्कम काही देता आली नाही. या पैशांसाठी सावकार कोठावळे याने तिच्याकडे तगादा लावला. 

सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल 

सावकार रोज सकाळी दरेकर यांच्या घरी येऊन पैशांची मागणी करीत असे. पैसे मिळत नसल्याचे पाहून अखेर त्याने पत्नीला पुढे केले. त्याच्या पत्नीने सुनंदा दरेकर हिच्या घरी जावून तिला शिवीगाळ करीत पैशांची मागणी केली होती. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या झटापटीचा व्हिडीओ सोशल माध्यमात चांगलाच व्हायरल झाला होता. 

पोलिस, सहकार खात्याकडून बोळवण 

दरम्यान, दरेकर यांनी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता, हा खासगी सावकारीचा प्रश्न असल्याने त्याची तक्रार सहायक निबंधकाकडे करा, असे सांगून पोलिसांनी तिची बोळवण केली. त्यानुसार, सुनंदा यांनी सहायक निबंधक कार्यालय गाठले असता, तेथेही तिला थंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही महिला हतबल झाली होती. मात्र, अखेर सहकार खात्याने दखल घेत खासगी सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

पुरावे उशिरा दिले 

तक्रारदार महिलेने उशिरा पुरावे दिल्याने गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. आता व्हिडीओ क्‍लिप व त्या महिलेचे प्रतिज्ञापत्र, यावरून गुन्हा दाखल केला आहे. 
- सुखदेव सूर्यवंशी, सहायक निबंधक, पारनेर 

आम्हाला न्याय मिळावा 
उशिरा का होईना गुन्हा दाखल झाला. आम्हाला न्याय मिळावा. पोलिसांनी योग्य पद्धतीने या गुन्ह्याचा तपास करावा, अशी आमची इच्छा आहे. 
- सुनंदा दरेकर, पीडित महिला, जवळे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या धमकीनंतर बाजारात धुमाकूळ! 1 मिनिटातच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; कोणते शेअर्स तोट्यात?

Sports News: नाशिकचा हर्षवर्धन केसरी विजेता; महाराष्ट्र केसरी कुस्ती;सोलापूरचा महेंद्र गायकवाड पुन्हा उपविजेता

Latest Marathi News Live Update : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे मच्छिमारांसाठी सवलतीच्या डिझेलवर परिणाम

Nagpur Accident: राज्यात रस्ते अपघातात वर्षभरात १५ हजार ५४९ नागरिकांचा मृत्यू; अपघातांच्या घटना वाढल्या, २०२४ मध्ये १५ हजार ७१५ मृत्यू!

Jyotiba Temple Incident : जोतिबा डोंगरावर हायव्होल्टेज ड्रामा! बिगर सासनकाठी घेऊन आलेल्या मद्यधुंद तरुणांनी थेट पुजाऱ्यांवरच उगारला हात; पहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT