Caught a revenue assistant taking a bribe Ahmednagar
Caught a revenue assistant taking a bribe Ahmednagar sakal
अहमदनगर

लाच घेताना महसूल सहायक सापळ्यात

सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर - अकृषक परवानगीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोघांकडून चार हजार रुपयांची लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील महसूल सहायकास रंगेहाथ पकडले. मंगेश विजय ढुमणे (वय ४१, रा. गणेश चौक, सिव्हिल हडको, अहमदनगर) असे पकडलेल्या महसूल सहायक आरोपीचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. ४) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ही कारवाई केली.

वडझिरे (पारनेर) येथील तक्रारदाराने त्यांच्या गावामध्ये आईच्या नावे घेतलेल्या जमिनीच्या अकृषक परवानगीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाकडे प्रकरण दाखल केले होते. ना हरकत प्रमाणपत्र दिले म्हणून ढुमणे याने तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांचे निघोज (ता. पारनेर) गावातील मित्र यांनीसुद्धा अकृषक परवानगीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले होते.

ते प्रमाणपत्र देण्यासाठी ढुमणे यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने एक जुलै रोजी लाचमागणीची पडताळणी केली. ढुमणे यांनी पंचासमक्ष दोन्ही कामांचे एकत्रित मिळून चार हजार रुपये पंचासमक्ष मागितल्याचे निष्पन्न झाले.

सोमवारी (ता. ४) ढुमणेविरोधात सापळा लावला होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील भूसंपादन विभागाच्या समोरील मोकळ्या व्हरांड्यात ढुमणे याला तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पोलिस निरीक्षक गाहिनीनाथ गमे, पोलिस अंमलदार रमेश चौधरी, विजय गांगूल, रवींद्र निमसे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, हरूण शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT