Celebration at Nevasa due to Shankarrao Gadakh's entry into Shiv Sena 
अहिल्यानगर

शिवबंधन बांधताच नेवाशात उमटली ही प्रतिक्रिया, मंत्री गडाख म्हणाले...

सुनील गर्जे

नेवासे : विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचाली चालू असतांनाच क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार  शंकरराव गडाख यांनी  कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वप्रथम शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला विनाअट जाहीर पाठिंबा दिला होता.

दरम्यान ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी मातोश्रीवर जाऊन  ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर तब्बल दीड-दोन महिन्यांनी सत्तेचा तिढा सुटून  शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची भाजप विरोधात महाआघाडीने सत्ता  स्थापन केली.

आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याची निवड होऊन ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. सत्तेची कोणताही खात्री नसतांना  निस्वार्थ व विनाअट शिवसेनेला जाहीर पाठिंबा देणारे  आमदार  शंकरराव गडाख यांना शिवसेनेच्या मंत्री पदाच्या वाटेवर करून त्यांना राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाचे मंत्री व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री पदावर संधी देण्यात आली.  

राज्याच्या मंत्रीमंडळात प्रथमच नेवासे तालुक्याला स्थान मिळाल्याने नेवासे तालुक्यात सर्वत्रच आनंद पसरला. गडाख यांच्या निवडीचे  सर्वपक्षीयांनी स्वागत केले. राजकारणात स्वच्छ, प्रामाणिक, सरळ आणि  स्पष्टवक्ता म्हणून मंत्री गडाख यांची सर्वत्र प्रतिमा आहे. त्यांनी सत्ता असो किंवा नसो ते नेहमीच सर्वसामान्यांसाठी व तालुक्याच्या विकासासाठी मोठा संघर्ष व काम केले आहे. मंत्री शंकरराव गडाख  मंत्री झाल्यावरही त्यांची साधीराहणी व थेट लोकांच्या संपर्कात राहून कामे करण्याची त्यांची पहिली पद्धत आजही कायम आहे. 

सेनेचे दिवंगत  उपनेते अनिल राठोड यांच्या अकस्मात निधनाने जिल्ह्यात शिवसेनेत झालेली पोकळी भरून निघण्यासाठी व मंत्री गडाख यांच्या आजच्या शिवसेना प्रवेशाने नेवासे तालुक्यासह जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्याप्रमाणात बदलण्याची शक्यता अाहे. 

गडाख यांच्या रूपाने नगर जिल्ह्यात शिवसेनाला एक खंबीर, मुरब्बी व मातब्बर  नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्यामुळे  नक्कीच नगर जिल्ह्यातील शिवसेनाला व्यापक स्वरूप येण्यास मदत होणार आहे. मंत्री गडाख यांच्या शिवसेना प्रवेशाची बातमी  समजताच नेवासे तालुक्यात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. अनेक ठिकाणी कार्येकर्त्यांसह नागरिकांनी एकमेकांना पेढे भरून शुभेच्छा दिल्या. एकंदरीत त्यांच्या या निर्णयाचे तालुक्यात स्वागत होत आहे.

शिवसेना वाढीसाठी झटणार : शंकरराव गडाख 

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी , उद्योग व्यवसाय, बेरोजगार तरुण तसेच समाजातील विविध घटकासाठी चांगले निर्णय घेतले अाहेत. राज्यावरील कोरोनाच्या संकट काळात मोठ्या हिमतीने त्यांनी आपले कार्य चालू ठेवले आहे. माझ्या वडिलांचा व हिंदू ह्र्दयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्नेहाचे संबंध होते.

गेल्या 10 वर्षात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या बरोबर अनेकदा संबंध आला म्हणून मी आज शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहे. त्यांनी माझ्यावर मोठा विश्वास टाकत मंत्रिपदाची संधी दिली. त्या विश्वासाला पात्र राहून सर्व सामान्य जनतेसाठी काम करणार आहे व शिवसेना वाढिसाठी झटणार आहे.

शिवसेना हा पक्ष शेतकरी, कष्टकरी तसेच सर्वसामान्य जनता यांच्या बरोबर अाहे. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग यात पक्षाचे मोठे काम आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.
 

संपादन - अशोक निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT