shirdi esakal
अहिल्यानगर

शिर्डीत वीकेंड लॉकडाउनचे वार बदला; भाविकांची गैरसोय दूर करा

सतीश वैजापूरकर

शिर्डी (जि.अहमदनगर) : आठवड्यातील शनिवार व रविवारी साईमंदिराच्या कळसाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मात्र नेमके याच दिवशी वीकेंड लॉकडाउन असल्याने भाविकांची गैरसोय होते. हे लक्षात घेऊन लाॅकडाउनचे वार बदलून गैरसोय दूर करा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, गौतम बॅंकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते व शिवसेनेचे कमलाकर कोते या नेत्यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली. कोते म्हणाले, ‘‘नुकत्याच संपलेल्या गुरुपौर्मिणा उत्सवात तीनही दिवस भाविकांची साईमंदिर कळसाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली. सध्या भाविक दररोज कळसाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. शनिवार व रविवार या दोन्ही दिवशी अधिक गर्दी होते. नेमके त्याच दिवशी लाॅकडाउन असल्याने भाविकांची गैरसोय होते. त्यामुळे हे दोन वार वगळून अन्य दोन दिवशी लाॅकडाउन लागू करून गैरसोय दूर करता येईल. आम्ही याबाबत साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनाही निवेदन देणार आहोत. गरज भासल्यास जिल्हाधिका-यांकडे पाठपुरावा करणार आहोत. (Change-the-weekend-lockdown-in-Shirdi-marathi-news-jpd93)

‘शिर्डीत वीकेंड लॉकडाउनचे वार बदला’

वीकेंड लॉकडाउनमुळे भाविकांची गर्दी व बाजारपेठ बंद असते. त्यामुळे भाविकांना खाद्यपदार्थ मिळत नाहीत. लाॅकडाउनचे वार बदलावेत, अशी मागणी भाविक करीत आहेत. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी. - कमलाकर कोते, शिवसेना नेते

विजय जगताप, सचिन कोते, राहुल गोंदकर, संजय शिंदे, अमृत गायके, उत्तम कोते, नगरसेवक दत्तात्रय कोते, अनिल पवार, सुनील बाराहाते, नवनाथ विश्वासराव, बाळासाहेब जगताप व गिरीश सोनेजी व मच्छिंद्र बावके आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Satana : सटाणा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा लोकनेता हरपला! देव मामलेदार यात्रेतील तो प्रसंग अन् दादांची तत्परता

मैत्री तुटली! अभिषेक बजाज आणि प्रणित मोरेनं एकमेकांना केलं अनफॉलो, 'हे' आहे मोठं कारण?

Latest Marathi News Live Update : मच्छीमार, शेतकरी, तरुणांसाठी सुवर्णसंधी; मोदींचं संसदेत भाष्य

खूप वाईट... जॉन अब्राहमचा चेहरा पाहून चाहते चकीत; अभिनेत्याला नेमकं झालंय तरी काय? म्हणतात-

Mobile Theft : आता मोबाईल चोरांची खैर नाही! स्वतः परत आणून देणार चोरलेला फोन; गुगलने आणलेले नवे Theft Protection फीचर्स पाहा

SCROLL FOR NEXT