अहमदनगर

शिर्डीत वाढल्या चॅर्टर प्लेनच्या घिरट्या, धनिक भक्तांमुळे विमानतळाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत सापडला

सतीश वैजापूरकर

शिर्डी ः विमानतळाची सुविधा आहे, तेथे बडे राजकारणी हेलीकॉप्टरऐवजी चॅर्टर फ्लाईटला अधिक पंसती देतात. कोविडच्या भितीमुळे सध्या बड्या राजकीय नेत्यांसह धनिक साईभक्तही येथे येण्यासाठी चॅर्टर प्लेनचा वापर करीत आहेत. त्यामुळे शिर्डी विमानतळावर चॅर्टर प्लेनची वर्दळ वाढली आहे. अन्य विमानाने येथे येणाऱ्या भाविकांत उत्तर भारताच्या तुलनेत दाक्षिणात्य भाविकांची संख्या दुपटीहून अधिक आहे. साईमंदिर दर्शनासाठी खुले झाल्यापासून दर आठवड्याला विमान फेऱ्यांची संख्या हळुहळू वाढते आहे.

आठवड्यातून तीन-चार चॅर्टर प्लेन या विमानतळावर उतरतात. बडे राजकीय नेते, नाशिक औद्योगिक वसाहतीत कामासाठी येणारे महानगरातील उद्योजक चॅर्टर प्लेन घेऊन येतात. तसे धनाढ्य साईभक्तदेखील चॅर्टर प्लेनचा वापर अधिक करू लागले आहेत. येथे विमानतळ नव्हते, त्यावेळी ही मंडळी हेलीकॉप्टरने ये-जा करीत. त्याची जागा आता चॅर्टर प्लेनने घेतली आहे. येथे येणाऱ्या चॅर्टर प्लेनमध्ये 2 ते 14 आसनक्षमतेच्या छोट्या विमानांचा समावेश आहे. त्यातून विमानतळाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळाला आहे. 

लॉकडाऊन पूर्वी विविध महानगरातून येथे तब्बल 17 विमाने ये-जा करीत होती. आता गेल्या महिनाभरात ही संख्या सहापर्यंत वाढली आहे. दिल्लीहून येणाऱ्या विमान प्रवाशांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. तुलनेत दक्षिण भारतातून येणारी विमाने व प्रवाशांची संख्या अधिक आहे.

सध्या स्पाईस जेट कंपनीचे बंगळुरू येथून दोन, दिल्ली व हैदराबाद येथून प्रत्येकी एक विमान येथून ये-जा करते. इंडिगो कंपनीची एअरबस दिल्ली येथून दिवसाआड येते. उद्यापासून (ता. 23) चेन्नई येथून या दोन्ही कंपन्यांची प्रत्येकी एक विमान ये-जा करू लागेल. पहिल्याच दिवशी या दोन्ही विमानांची सर्व तिकीटे विकली गेली आहेत. 


लॉकडाऊनपूर्वी विमान प्रवाशांची संख्या मोठी होती. काकडी येथील सुमारे 145 वाहने प्रवाशांची शिर्डीच्या साईमंदिरापर्यंत ने-आण करीत. एक खेपेला 600 रुपये मिळायचे. दोन खेपा होत. सगळे काही मजेत चालले होते. कोविडमुळे अर्थकारण थांबले. वाहनचालक-मालक अडचणीत आले. प्रवाशांची संख्या कमी झाल्याने सध्या तीन दिवसांतून एकदा भाडे मिळते. वाहनचालकांची अडचण अद्याप दूर झालेली नाही. 
- प्रभाकर गुंजाळ, अध्यक्ष, काकडी विमानतळ वाहतुकदार संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT